शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in sangli-सांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:17 IST

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २5 मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारीशहरात जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा

सांगली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २5 मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (ू) व (े), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.शहरात जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा कोरोना या विषाणूचा वाढता पादुर्भाव पाहता संपूर्ण सांगली जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये.

यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या शहरात सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू (किराणा, भाजीपाला, दूध, औषध) घरपोच देण्याची सेवा करण्यात आलेली आहे. तरी नागरिेकांनी संचार बंदी काळात घराबाहेर पडू नये व या सेवेचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्क क्रमांक- औषधे -9325251555, किरकोळ किराणा-9823180070, भाजीपाला -9970555570, दुध -9822132222, इतर सेवेसाठी -9423871888 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली