शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : भारतीय जैन संघटनेमार्फत आता ‘मिशन-कोविड कनेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:12 IST

रक्तदान, प्लाझ्मा दान, डॉक्टर आपल्या दारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड काळात सामान्य लोकांना मदतीचा हात देणाऱ्या भारतीय जैन संघटनेमार्फत आता संपूर्ण महाराष्ट्रात  'मिशन - कोविड कनेक्ट’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीमधून होणार आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेमार्फत आता ‘मिशन-कोविड कनेक्ट’: सुरेश पाटील राज्यस्तरीय अभियानाचा सांगलीतून उद्या प्रारंभ

सांगली : रक्तदान, प्लाझ्मा दान, डॉक्टर आपल्या दारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड काळात सामान्य लोकांना मदतीचा हात देणाऱ्या भारतीय जैन संघटनेमार्फत आता संपूर्ण महाराष्ट्रात  'मिशन - कोविड कनेक्ट’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीमधून होणार आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील यांनी दिली.पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहर केला आहे. सांगली जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. शासन व प्रशासन त्यांच्यास्तरावर साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तरीही कोविड केअर सेंटर्स व कोविड हॉस्पिटल्सची कमतरता भासत आहे. कोरोनाविषयीचे गैरसमज व अवास्तव भीतीसुध्दा वाढतच आहे.

आपल्या सांगली जिल्हयातील जनमान्य व्यक्तींनी एकत्र येऊन एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था हे गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.

आता महाराष्ट्रात 'मिशन-कोविड कनेक्ट’ हा उपक्रम त्यांनी आखला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सांगलीतील राजमती भवन, नेमिनाथनगर येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. शांतिलाल मुथ्था यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चोधरी, महापालिका आयुक्त नितिन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थिती राहणार आहेत.सुरेश पाटील म्हणाले, भारतीय जैन संघटनेमार्फत शैक्षणिक, आरोग्य, दुष्काळमुक्त अभियान आदी विषयांवर सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात प्लाझ्मा डोनर्स जीवनदान योजना, रक्तदान शिबिर, निराश्रितांना भोजन, डॉक्टर आपल्या दारी, मिशन झिरो असे प्रकल्प व उपक्रम राबविले. मिशन - कोविड कनेक्ट' या महत्वाकांक्षी प्रकल्पातून कोरोनाबाबत  असलेली अवास्तव भीती व गैरसमज दुर करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

होम क्वारंटाईन असलेल्या बाधितांना योग्य मार्गदर्शन, समाजाच्या पुढाकाराने जिल्हयामध्ये कोविड केअर सेंटर्स निर्माण करणे, खासगी रूग्णालयांचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करणे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त डॉक्टरांना कोविडशी लढताना तज्ज्ञ व अनुभवींकडून प्रशिक्षण देणे, यासारख्या गोष्टी केल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuresh Patilसुरेश पाटीलSangliसांगली