शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कोरोनामुळे यंदा सांगलीच्या गणरायांचे परदेशगमन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:15 IST

गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही.

ठळक मुद्देकोरोनामुळे यंदा सांगलीच्या गणरायांचे परदेशगमन रद्दगणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

संतोष भिसे सांगली : गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही.यंदा २२ अॉगस्टपासून सुुरू होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यदाकदाचित साथ संपली तरी, संसर्गाची काळजी घेऊनच परवानगी दिली जाईल. भीतीने लोकही रस्त्यावर येणार नाहीत. वर्गणीसाठी मंडळांची कसरत होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून उत्सव साधेपणाने होईल. याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

मे संपत आला तरी मूर्ती तयार नाहीत. प्लास्टर, शाडू, रंग, चमकी आदी कच्चा माल मुंबई, पुणे, पेण, पनवेल येथून येतो. कारागीर परराज्यातून तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, कऱ्हाड येथून येतात. लॉकडाऊनमुळे साऱ्याचा खोळंबा झाला.

आता वाहतूक सुरू झाल्याने कामाला गती येण्याची अपेक्षा आहे. मोठी मंडळे मे-जूनमध्येच मोठ्या व उंच मूर्तींचे बुकिंग करतात. यंदा मंडळे अजूनही फिरकली नसल्याची माहिती मूर्तिकार माधव गाडगीळ यांनी दिली. छोट्या व कमी उंचीच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल आहे.सांगलीतून दरवर्षी अमेरिकेत कॅनडाला मूर्ती पाठविल्या जातात. तेथील मराठी मंडळे व काही व्यावसायिक मागवून घेतात.

यंदा अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजविला असल्याने तेथील व्यावसायिक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे त्यांनी अॉर्डर नोंदविलेल्या नाहीत. तेथील महामारी लवकर संपण्याची चिन्हे नसल्यानेही मूर्तींना मागणी नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanpati Festivalगणेशोत्सवSangliसांगली