शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 13:28 IST

सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस हे सधन तालुके सध्या कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहेत. महापालिका क्षेत्रापाठोपाठ या तीन तालुक्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दुष्काळी आटपाडी, जत आणि डोंगरी शिराळा तालुक्यात रुग्णांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे.

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण : वाळवा, मिरज तालुक्यात कहर तुलनेत आटपाडी, जत, शिराळा तालुक्यात संख्या कमी

शीतल पाटील सांगली : जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस हे सधन तालुके सध्या कोरोनाचा हॉट स्पॉट बनले आहेत. महापालिका क्षेत्रापाठोपाठ या तीन तालुक्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दुष्काळी आटपाडी, जत आणि डोंगरी शिराळा तालुक्यात रुग्णांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे.जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. प्रामुख्याने पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांतून गावी परतलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिराळा, आटपाडी, खानापूर या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक होती. अनलॉकनंतर महापालिका क्षेत्रात मात्र कोरोनाचा कहर सुरू झाला.जूनअखेरपर्यंत महापालिका क्षेत्रात केवळ २४ कोरोनाचे रुग्ण होते. पण जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात साडेतेरा हजार रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील सधन तालुक्यांतही कोरोनाचा संसर्ग वाढला. विशेषत: वाळवा, मिरज आणि पलूस या तीन तालुक्यांत दररोज ५० ते १०० रुग्ण सापडू लागले.

महापालिका क्षेत्रात सध्या १३,५२३, वाळवा तालुक्यात ३,८३३, तर मिरज तालुक्यात ३,४६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल तासगाव तालुक्यात २,१५६ व पलूसमध्ये १,९७७ रुग्ण सापडले आहेत.पालकमंत्र्यांचा तालुका पहिल्या क्रमांकावरमहापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या तालुक्यात संसर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत तर दररोज ९० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली