शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 10:58 IST

corona virus, sanglinews तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम जिल्ह्यात ८० नवे रुग्ण; ५३ जण कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू

सांगली : तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यास दुजोरा मिळणारी आकडेवारी रोज समोर येत आहे. त्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना रॅपिड ॲन्टिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तरीही बाधितांच्या संख्येतील वाढ चिंताजनक ठरत आहे.शनिवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तासगाव व जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १६८८ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत ६९८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४१९५ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ५८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिडच्या चाचण्या दोन दिवसांपासून वाढविण्यात आल्या आहेत.उपचार घेत असलेल्या ४०८ रुग्णांपैकी ७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ६४ जण ऑक्सिजनवर, तर १३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

  • आतापर्यंतचे एकूण बाधित ४६४२२
  • उपचार घेत असलेले ४०८
  • कोरोनामुक्त झालेले ४४३२६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १६८८शनिवारी दिवसभरात

  • सांगली
  • मिरज १
  • मिरज तालुका १३
  • वाळवा १२
  • तासगाव, जत प्रत्येकी १०
  • आटपाडी ८
  • खानापूर ७
  • कवठेमहांकाळ ६
  • पलूस ४
  • कडेगाव २
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली