शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:37 IST

झरे (ता. आटपाडी) येथील ५८ वर्षीय कोरोणा बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे . ही महिला १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचाराखाली होती. त्यांना मधुमेह , थायरॉईड आणि हृदयविकार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळीझरेतील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील ५८ वर्षीय कोरोणा बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे . ही महिला १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचाराखाली होती. त्यांना मधुमेह , थायरॉईड आणि हृदयविकार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात ७८ रूग्ण कोरोनामुक्त, उपचाराखाली ५७  रूग्ण

कोरोनामुळे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४३ झाली असून ८१ जण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या ५७ आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण १४३ रुग्ण कोरोनाबाधित ठरले आहेत. उपचाराखाली असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

काल दुपारी १ वाजेपर्यंत ११ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील करगणी येथील ३८ वर्षाचा पुरूष, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ७५ वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षाची स्त्री, शिराळा तालुक्यातील काळुखेवाडी येथील ४० वर्षाची स्त्री (मणदूर येथील पॉझीटीव्ह रूग्णाची मुलगी), कवठेमहांकाळ तालुक्यातील खरसिंग येथील मुंबईवरून आलेला २१ वर्षाचा पुरूष, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ठाणे वरून आलेला १९ वर्षाचा पुरूष, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील मुंबईवरून आलेला ३५ वर्षाचा पुरूष, मिरज तालुक्यातील मालगांव येथील पनवेल वरून आलेली ५० वर्षाची महिला, खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील ५५ वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), जत येथील ३५ वर्षाचा पुरूष (खलाटी पॉझीटीव्ह रूग्णाचा सहवासीत).  आजअखेर ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या ९९ असून शहरी भागातील २९ तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या ११ इतकी आहे.

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील पॉझीटीव्ह आलेला ६० वर्षाचा रूग्ण नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला आहे. औंढी तालुका जत  येथील ५५ वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील ४८ वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थिर आहे. खिरवडे (शिराळा) येथील ५६ वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थिर आहे. मणदुर (शिराळा) येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थिर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली