शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:28 IST

corona virus Health Tea Sangli- कोरोनाकाळात आरोग्याबाबत वाढलेली सतर्कता चहाच्या नव्या संस्कृतीला जन्म देत आहे. त्यामुळे पारंपरिक चहापेक्षा ग्रीन टीच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. काही चहा उत्पादकांना मागणीत चौपट वाढ झाल्याचाही अनुभव येत आहे. येत्या काही महिन्यात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : ग्रीन टीची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढलीइम्युनिटी बुस्टर म्हणून वापर वाढला, उत्पादन वाढण्याची चिन्हे

अविनाश कोळीसांगली : कोरोनाकाळात आरोग्याबाबत वाढलेली सतर्कता चहाच्या नव्या संस्कृतीला जन्म देत आहे. त्यामुळे पारंपरिक चहापेक्षा ग्रीन टीच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. काही चहा उत्पादकांना मागणीत चौपट वाढ झाल्याचाही अनुभव येत आहे. येत्या काही महिन्यात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.ग्रीन टीचे देशांतर्गत वार्षिक उत्पादन २० ते २५ मिलियन किलो (२ ते अडीच लाख टन) इतके आहे. देशातील एकूण सर्व प्रकारच्या चहाचे उत्पादन १३०० मिलियन किलोच्या घरात आहे. एकूण चहा उत्पादनात ग्रीन टीचे उत्पादन १.५ ते २ टक्के इतके आहे.

देशांतर्गत ग्रीन टीची मागणी कोरोनापूर्वी कमी होती. ती आता काही ठिकाणी दुप्पट, तर काही ठिकाणी चौपट झाली. इम्युनिटी बुस्टर (रोगप्रतिकारक पेय) म्हणून ग्रीन टीचा वापर वाढला आहे. मार्च ते नोव्हेंबर या काळात चहाची नवी ग्रीन संस्कृती वाढत असल्याने मागणीतही तितकीच वाढ झाली आहे.जगातील एकूण ग्रीन टी उत्पादनात सर्वाधिक म्हणजेच ५० ते ८० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. पारंपरिक दूध व साखरेचा वापर करून पिल्या जाणाऱ्या सीटीसी चहाचे भारतातील उत्पादन हे ९० टक्के इतके आहे. मागणी वाढल्याने ग्रीन टीच्या उत्पादनात आता वाढ होण्याचा अंदाज आहे.दरात वाढ होतेयमागणी वाढताना उत्पादन घटल्याने चहाच्या दरात वाढ झाली आहे. उच्च दर्जाच्या चहाचा दर सध्या ३०० ते ३२५ रुपये किलो, मध्यम दर्जाच्या चहाचा दर २२५ ते २५० रुपये, तर दक्षिण भारतातील चहाचा दर १३० ते १५० रुपये किलो आहे. कोरोनापूर्वीच्या दराशी तुलना करता, ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी २५० रुपये किलो असलेल्या ग्रीन टीचा दर आता ४०० रुपयांवर गेला आहे.चहा उद्योजक व फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन (फेटा) चे सदस्य राजेश शहा यांनी सांगितले कि, कोरोना काळात आरोग्यदायी पेय म्हणून ग्रीन टीची मागणी अनपेक्षितरित्या वाढली आहे. आमच्याकडे ग्रीन टीच्या मागणीत जवळपास ४०० टक्के वाढ दिसत आहे. देशात सरासरी दुपटीपेक्षा अधिक मागणी वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSangliसांगली