शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

corona virus : कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:27 IST

राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते.

ठळक मुद्देकोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम : जयंत पाटीलप्रशिक्षीत स्वयंसेवकांची गरज पूर्ण करणार

सांगली : कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी सर्वात मोठी गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षीत स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची मदत, जे डॉक्टर सेवा देत आहेत त्यांना मदत करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, त्यामध्येही कोरोना कमांडोची मदत होणार आहे. ही एक चांगली कल्पना असून याला अनन्य साधारण असे महत्व आहे.

यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. भारतीय जैन संघटनेने देशात अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना मुक्तीसाठीही अनेक उपक्रम राबवित आहेत. सर्वांनी प्रयत्न केला तर गावेच्या गावे कोरोना मुक्त करू शकतो. प्रत्येक गावात कोरोना रूग्ण शोधून त्यांना आयसोलेशन किंवा विलगीकरण कक्षात ठेवल्यास कोरोनाच्या फैलावास त्या गावात आळा बसणार आहे. प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी डॉ. अ‍भिजीत चौधरी म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. कोरोनाशी यशस्वीपणे लढण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार झालेले प्रशिक्षीत युवक कोविड केअर सेंटरमध्ये पॅरॉमेडिकल स्टाफला तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतही मदत करू शकतो. या उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी ऑनलाईन व्हिडीओव्दारे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन धन्यकुमार शेट्टी व आभार लेफ्टनंट सुभाष पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास कोरोना कमांडो प्रशिक्षणासाठी एनसीसी चे विद्यार्थी व युवक उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली