शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीतील घोळ गर्भवतीच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:26 IST

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते.

ठळक मुद्दे सांगली शहरातील प्रकार अँटिजेनमध्ये पॉझिटिव्ह, लॅबचा अहवाल निगेटिव्ह

सांगली : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते.

काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. अखेर मंगळवारी सकाळी या महिलेची प्रसुती झाली आणि या कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.शहरातील गर्भवती महिलेला सोमवारी सकाळी नऊ वाजता प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी कुटुंबियांनी केली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. या कुटुंबाने नगरसेवक चव्हाण यांच्याशी संपर्क केला.

चव्हाण यांनी अँटिजेन चाचणीसाठी महिलेला महापालिकेच्या रुग्णालयात नेले. तिथे अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. गर्भवती महिलेला कोरोना झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांना रडू कोसळले. चव्हाण यांनी कुटुंबियांना धीर देत खासगी प्रयोगशाळेमध्ये चाचणीचा सल्ला दिला. दिवसभर कुटुंबीय तणावाखाली होते.

सायंकाळी महिलेचा स्वॅब खासगी लॅबकडे देण्यात आला. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी आला. तो निगेटिव्ह होता. हा अहवाल घेऊन कुटुंबियांनी प्रसुतीसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी तिने एका मुलीला जन्म दिला. गर्भवती महिला व तिचे कुटुंबीय सोमवारी दिवसभर काळजीत होते. आता अँटिजेन चाचणी खरी, की लॅबची चाचणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दुसऱ्या एका घटनेत महापालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पण सोमवारी दिवसभर त्याला साधा बेडही मिळाला नाही. शेवटी या कर्मचाऱ्याला होम आयसोलेशन करण्यात आले. त्यातच मंगळवारी मिरजेतील स्वच्छता निरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता राबणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाºयाची अवस्था बिकट झाली आहे. यावर चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली