शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli : कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:34 IST

विजयनगर, सांगली येथील कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १२ जणांचा अहवाल अजून येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह अजून १२ जणांचा अहवाल येणार : डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : विजयनगर, सांगली येथील  मृत कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी पंधरा जणांच्या स्वाबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १२ जणांचा अहवाल अजून येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.शहरातील विजयनगर येथील सिध्दीविनायक हौंसिग सोसायटीमधील एका बँक कर्मचार्‍यास कोरोना झाल्याचे रविवारी तपासणीत स्पष्ट झाले होते. या रूग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.

विजयनगर येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी इस्लामपूर येथे २६ कोरोना रुग्ण आढळले होते. जिल्हा प्रशासनाने विजयनगरचा संपूर्ण परिसर सील केला होता. तसेच या व्यक्तीच्या संपर्कातील ४३ लोकांना आयसोलेशन कक्षात ठेवले होते व त्यांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. 

यात मृत कोरोनाबाधित व्यक्तीचे आई वडील पत्नी मुलगा भाऊ या पाच जणांचा बँकेतील अकरा कर्मचारी, खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व त्यांचे सहाय्यक यांचा समावेश होता. यातील कोरोनाबाधिताची पत्नी, आई-वडील व भाऊ यांचे अहवाल सोमवारी सकाळी निगेटिव्ह आले.

सर्व ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सोमवारी रूग्णाच्या कुटुंबातील ५ व्यक्तीसह अन्य ११ असे १६ जणाचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मंगळवारी आणखी १५ जणाचे अहवाल प्राप्त झाले असून तेही निगेटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत ४३ पैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल प्राप्त झाला असून बँकेतील त्यांचे सहकारी, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचार्‍यांसह इतर सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली