शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli-कडेगाव तालुक्यातील कोतीज येथील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:47 IST

कोतीज (तालुका कडेगाव) येथील मुंबईस्थित ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. याशिवाय येतगाव येथील चार जणांचे कोरोना चाचणी अहवालही दुसऱ्यांदा निगेटीव्ह आले आहेत. 

ठळक मुद्देकडेगाव तालुक्यातील कोतीज येथील ११ जणांचे अहवाल निगेटीव्हयेतगावच्या चौघांची दुसरी चाचणीही निगेटीव्ह  

कडेगाव : कोतीज (तालुका कडेगाव) येथील मुंबईस्थित ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.  याशिवाय येतगाव येथील चार जणांचे कोरोना चाचणी अहवालही दुसऱ्यांदा निगेटीव्ह आले आहेत. कडेगाव तालुक्यात प्रशासनाची सतर्कता, आरोग्य विभाग व पोलिसांची कर्तव्य दक्षता यामुळे कोरोना हरतोय असे  दिलासादायक चित्र दिसत आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज (तालुका कडेगाव) येथील ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे तालुका प्रशासनास ३ एप्रिलला (रविवारी) समजले.

यापूर्वी या कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली, पुतण्या व पुतण्याची पत्नी व पुतण्याचा मुलगा असे पाच जण अनधिकृत प्रवास करून गुरुवार, दि २३ एप्रिलरोजी सकाळी कोतीज गावात आले होते. यामुळे प्रशासनाने मुंबईहून आलेल्या पाच जणांसह त्यांच्या कोतीज येथील कुटुंबातील अन्य सहा अशा ११ जणांना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

सांगली येथील वैद्यकीय पथकाने या ११ व्यक्तींचे 'स्वॅब' दि. ५ मे रोजी तपासणीसाठी घेतले होते. आता या ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याशिवाय कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे नोकरीस असलेल्या व कराड येथे वास्तव्यास असलेल्या येतगाव येथील ३५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते.

ती व्यक्ती येतगाव येथे एक दिवस मुक्काम करून गेल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्या चौघांचा किरोना चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे.

यापूर्वी खेराडे वांगी येथील ३२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल दोन्ही वेळा निगेटीव्ह आले आहेत. यामुळे खेराडे (वांगी), येतगाव, कोतीजसह कडेगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली