शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:51 IST

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वॅब तपासणी करण्यात येईल.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्याला दिलासा परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटीललॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत अनावश्यक बाहेर पडू नका, धार्मिक स्थळांवर गर्दी करू नका

सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वॅब तपासणी करण्यात येईल.

उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थीर आहे. जिल्ह्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली आहे व काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत जनतेने घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करून विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज संदीप सिंह गील, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. नणंदकर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी मिरज डॉ. समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, यांच्यासह विविध यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व तालुक्यात जाऊन स्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यात समाधानकारक स्थिती असून जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. द्राक्ष, केळी, कलिंगड आदि उत्पादक शेतकरी जे माल बाहेर पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करावे.

जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढणार नाहीत याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. सद्या जिल्ह्यात एकूण १६ शिवभोजन केंद्रे सुरू असून कामगार, गरजवंत, गरीब यांची उपासमार होऊ नये म्हणून आवश्यक तेथे तहसिलदार यांनी शिवभोजन केंद्रे सुरू करावीत, असे सांगून ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शालेय पोषण आहार मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असून कोणत्याही धार्मिक स्थळावर लोकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन केले. मिरज येथे अद्ययावत कोरोना चाचणी लॅब चालू झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यानांही त्याची सेवा मिळत आहे. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर मिरज सिव्हील हॉस्पीटल पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. शहरी व ग्रामीण भागात जिल्हा परिषद व महानगरपालिकेने केलेल्या औषध फवारणीचेही यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले.जीवनावश्यक सुविधा सुरळीत रहाणे ही माझी नैतिक जबाबदारी- पालकमंत्री जयंत पाटीलजिल्ह्यातील जनता हे माझे कुटुंब असून त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होईल हे पहाणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळेच मी जिल्ह्यात गावोगावी जाऊन बैठका घेतल्या, लोकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, आरोग्य अधिकारी व अन्य संबधित सर्व यंत्रणा यांना आवश्यक सूचना देण्याचे काम सातत्याने केले. ज्या स्थितीतून आपण सर्वजण जात आहोत अशावेळी लोकांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, अशा भावना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीJayant Patilजयंत पाटील