शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli : कोरोना मुक्ती ही सर्व यंत्रणांच्या सामूहीक प्रयत्नाचे यश :अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:20 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.

ठळक मुद्देकोरोना मुक्ती ही सर्व यंत्रणांच्या सामूहीक प्रयत्नाचे यश :अभिजित चौधरीकोरोना रूग्ण घटलेतरी दक्षता आवश्यकच

सांगली : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे २६ रूग्ण होते. यातील २४ जण निगेटिव्ह आले आहेत. तर बालकाचे नमूने दुसर्‍यांदा तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या बालकाचा पहिले नमुने निगेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल शनिवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षीत आहे. असे झाल्यास मिरज शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षाता आता केवळ एका रूग्णावर उपचार सुरू राहणार असून लवकरच हा रूग्णही कोरोनामुक्त होईल.कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या नियमांचे प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे पालन केल्यानेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. प्रशासनातील प्रत्येक घटकाने या कालावधीत अत्यंत जबाबदारीने काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात राहू शकली व आहे ते रूग्णही बरे झाले आहेत.कोरोना बाधितांची संख्या घटली म्हणून जिल्ह्यातील जनतेने आता अजिबात गाफिल राहू नये उलट अधिक सर्तकता बाळगली पाहिजे. प्रशासनाकडूनही योग्य ते नियंत्रण कायम असणार आहे. नियमीतपणे हात धुणे व सोशल डिस्टस्टटींग पाळणे अजूनही गरजेचे आहे.सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांना याची झळ बसू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या भावाने विक्री सुरू असल्याचे प्रकार लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून याबाबतही जनतेने निश्‍चिंत रहावे असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळूंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली