शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli : कडेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:01 IST

सांगली  जिल्ह्यातील कडेगाव  तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून साळशिंगे (ता. खानापूर) येथील किरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द  (ता. कडेगाव) येथील  चौघांमधील १०  वर्षाच्या  मुलगा  पॉझिटिव्ह असल्याचा  अहवाल  आला असून अन्य तिघांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. यामुळे भिकवडी  परिसरासह कडेगाव तालुम्यात  खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे भिकवडीतील १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्हखबरदारी म्हणून गाव पुर्णतः सील

कडेगाव/सांगली सांगली  जिल्ह्यातील कडेगाव  तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून साळशिंगे (ता. खानापूर) येथील किरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द  (ता. कडेगाव) येथील  चौघांमधील १०  वर्षाच्या  मुलगा  पॉझिटिव्ह असल्याचा  अहवाल  आला असून अन्य तिघांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. यामुळे भिकवडी  परिसरासह कडेगाव तालुम्यात  खळबळ उडाली आहे.अहमदाबाद (गुजरात) येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या  महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी (ता.४  )रोजी येथे आले  होते. या  चौघांनाही  भिकवडी येथे होम क्वारंनटाईन केले होते.यानंतर साळसिंगे येथील महिलेला कोरोना झाल्याचे रविवारी (ता.१० ) रोजी निष्पन्न झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाने भिकवडी खुर्द येथील या चौघांनाही  सोमवारी (ता.११ ) रोजी होम क्वारंनटाईनमधून कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंनटाईन केले होते .

आता त्यापैकी १० वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान  प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड,तहसीलदार डॉ. शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे ,पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस  यांचेसह  आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द  येथे  धाव घेवून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत . संबधित कुटुंब रहात असलेल्या परिसरासह गाव सीलबंद केले आहे. आरोग्य विभागाने होम टू होम सर्वे सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुक औषध फवारणी करण्यात येत आहे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.१४ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात भिकवडी खुर्द येथील त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या  व गावात  होम क्वारंनटाईन केलेल्या १४  जणांना आरोग्य विभागाने आता  कडेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण  कक्षात दाखल केले आहे. आज त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली