जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसात २३२८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:30+5:302021-05-07T04:29:30+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी नवा उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल २३२८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील १८ आणि ...

Corona explosion in the district; 2328 new patients per day | जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसात २३२८ नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसात २३२८ नवे रुग्ण

Next

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी नवा उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल २३२८ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील १८ आणि जिल्ह्यातील ३८ अशा ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रासह आटपाडी, कडेगाव, खानापूर, तासगाव, जत आणि मिरज तालुक्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

बुधवारी १८३३ जण बाधित आढळले होते. त्यात ४९५ रुग्णांची वाढ होत गुरुवारी बाधितांचा आकडा २३२८ झाला आहे. जिल्ह्यातील ३८ मृतांमध्ये सांगलीत २, मिरज ९, कुपवाड १, वाळवा ६, तासगाव, जत प्रत्येकी ४, पलूस खानापूर, मिरज तालुका प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५७४ चाचण्या घेण्यात आल्या. यात आरटीपीसीआरअंतर्गत ३१५३ नमुन्यांच्या तपासणीतून १२१४, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४४२१ नमुन्यांच्या तपासणीतून ११९२ जण बाधित आढळले आहेत.

महापालिका क्षेत्रात ३१४, तर मिरज तालुक्यात ३०७, जत २५६, खानापूर २१५, तासगाव २५८, कडेगाव तालुक्यात २१५ असे मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत असून, ती १५ हजार ९०२ वर पोहोचली आहे. त्यात २४८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२६६ जण ऑक्सिजनवर, तर २१९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील ७८ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २६, तर कर्नाटकातील २७ जणांचा समावेश आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ८५६४७

उपचार घेत असलेले १५९०२

कोरोनामुक्त झालेले ६७२३४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २५११

गुरुवारी दिवसभरात

सांगली १७५

मिरज १३९

मिरज तालुका ३०७

जत २५६

तासगाव २५८

खानापूर २४३

कडेगाव २१५

आटपाडी २०८

वाळवा १८७

कवठेमहांकाळ १५५

पलूस ११९

शिराळा ६६

Web Title: Corona explosion in the district; 2328 new patients per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.