शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

जिल्ह्यात कोरोनाने हिरावले १७५ बालकांवरील मायेचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाने कर्ताधर्ता माणूस हिरावल्याने अनेक कुटुंबांची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. कमावता कुटुंब प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाने कर्ताधर्ता माणूस हिरावल्याने अनेक कुटुंबांची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. कमावता कुटुंब प्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. विशेषत: पालक हिरावलेल्या मुलांचे भवितव्य तूर्त अंधकारमय आहे.

पालक हरवलेल्या मुलांचे सर्वेक्षण जिल्हा बालसंगोपन विभागामार्फत केले जात आहे. कोरोनाने मृत झालेल्या साडेतीन हजार व्यक्तींची यादी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यातील कितीजणांच्या पश्चात लहान मुले आहेत याची माहिती बाल संरक्षण अधिकारी घेत आहेत. शासकीय नियमानुसार १८ वर्षांखालील मुलांना संरक्षण दिले जाणार आहे. आजवरच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १७५ मुलांचे पालकत्वाचे छत्र हरवल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी काहींच्या वडिलांचे निधन झाले आहे, तर काहींनी आईला गमावले आहे. पाच मुलांचे आई आणि वडील असे दोन्ही पालक मृत झाले आहेत. आई मृत झालेली १७ तर वडील मृत झालेली १५३ मुले आढळली आहेत.

बाल संरक्षण विभागाने १८ वर्षांखालील निराधार मुलांचा शोध घेतला. पहिल्या टप्प्यात तरुण पालकांच्या कुटुंबातील मुलांची माहिती घेतली. पण काही वयस्क पालकांच्या घरीही लहान मुले असल्याचे आढळले. उशिरा अपत्यप्राप्ती झालेल्या किंवा वयस्क अवस्थेत मुले दत्तक घेतलेल्या पालकांच्या घरी अशी लहान मुले आढळली. पालकाच्या कोरोनाने झालेल्या मृत्यूनंतर ती निराधार झाली होती. सर्वेक्षण अद्याप सुरूच असून नागरिकांनी अशा मुलांची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ व बाल संरक्षण अधिकारी ७९७२२१४२३६ यांच्याशी संपर्क करता येईल.

बॉक्स १

निराधार मुलांची तात्पुरती व्यवस्था

सर्वेक्षणादरम्यान आढळलेली काही मुले भारतीय समाज सेवा केंद्रात ठेवली आहेत. काही मुले शासकीय निरीक्षणगृहात तर काही मुलांना भगिनी निवेदिता केंद्रात ठेवले आहे. शासनाच्या पुढील निर्णयापर्यंत ती तेथेच राहतील.

बॉक्स २

अनधिकृत दत्तक टाळण्याकडे लक्ष

पालक हरवलेल्या मुलांची अनधिकृत दत्तक प्रक्रिया होऊ नये यावरदेखील प्रशासनाचे लक्ष आहे. राज्यभरात कोरोनाने मृतांची संख्या वेगाने वाढत गेली, तेव्हा अशा मुलांच्या दत्तकासाठी समाजमाध्यमांवर पोस्ट व्हायरल होत गेल्या. निराधार मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले, पण शासनाने या पोस्ट बेकायदेशीर ठरविल्या.

बॉक्स ३

सर्वेक्षणासाठी अंगणवाड्यांची मदत

निराधार बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मदत घेतती जात आहे. कोरोनाने मृत झालेल्या कुटुंबांपर्यंत त्या पोहोचत आहेत. शेजारच्या कुटुंबांनीही त्याची माहिती हेल्पलाईनवर, गावातील प्रशासनाकडे किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट

रुग्णालयामध्येच फॉर्म भरून घेणार

रुग्ण मरण पावल्यानंतर त्याच्या बालकांच्या संगोपनाविषयी प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होतानाचा रुग्णाकडून फॉर्म भरून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच त्याच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे. कुटुंबातील अज्ञान बालकाचा ताबा कोणाकडे द्यायचा याचा तपशील रुग्णाकडून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका आयुक्त व आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकाचे फलकही रुग्णालयात लावायचे आहेत. निराधार बालकांची जबाबदारी अन्य नातेवाईक घेतील काय किंवा बालगृहात दाखल करावे लागेल काय याची माहिती कृती दल घेणार आहे.

जिल्ह्यातील कोविडच्या रुग्णांचा आढावा

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १,२०,२६९

बरे झालेले रुग्ण १,०५,७८२

सध्या उपचार सुरू असलेले ११,००७

एकूण मृत ३,४८०

कोट

जिल्ह्यात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील निराधार बालकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनास्थिती संपेपर्यंत सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. त्यासाठी बालकल्याण विभागाची मदत घेतली आहे. निराधार बालकांविषयी कोणीही अनधिकृत व्यवहार करू नयेत. प्रशासनाला माहिती द्यावी. निराधार बालकांची सोय विविध सामाजिक संस्थांमध्ये केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. १८ वर्षांखालील मुलांची सर्वेक्षणात नोंद घेतली आहे. काही वयस्क पालकांच्या कुटुंबातही लहान मुले आम्हांला आढळून आली आहेत.

- बाबासाहेब नागरगोजे, बाल संरक्षण अधिकारी, सांगली