शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

जिल्ह्यात ९३७ जणांना कोरोना; २३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी काहीशी घट झाली. दिवसभरात नवे ९३७ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील चौघांसह जिल्ह्यातील १९ ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी काहीशी घट झाली. दिवसभरात नवे ९३७ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील चौघांसह जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. ८४९ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे तीन नवे रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज १, कुपवाड २, वाळवा ५, पलूस ३, खानापूर, मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, जत, कवठेमहांकाळ, शिराळा आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, ९ हजार ७०३ जण उपचार घेत आहेत. यातील ९८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८३२ जण ऑक्सिजनवर तर १५३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने शुक्रवारी आरटीपीसीआरअंतर्गत ३,७५२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात २४९ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ९,७४९ जणांपैकी ६९४ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर ६ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी वाढ झाली. त्यानुसार, दिवसात तीन नवे रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या २९३ वर पोहोचली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,४७,७८७

उपचार घेत असलेले ९,७०३

कोरोनामुक्त झालेले १,३३,९७६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,१०८

पॉझिटिव्हिटी रेट ६.६३

शुक्रवारी दिवसभरात

सांगली १२७

मिरज ३०

आटपाडी ३९

कडेगाव ५४

खानापूर ४१

पलूस ५९

तासगाव ४८

जत ५०

कवठेमहांकाळ ८३

मिरज तालुका ११६

शिराळा ११६

वाळवा १७४