सांगली : जिल्ह्यात हजारावर गेलेल्या कोरोना रुग्णसंख्येत घट होत रविवारी ८५२ जणांना कोरोनाचे निदान झाले. मात्र, घटत चाललेल्या मृत्युसंख्येत वाढ होत परजिल्ह्यातील पाचजणांसह जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ९४३ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, शिराळा ४, तासगाव, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३, कडेगाव, जत, वाळवा तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ३९५० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३१२ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲंटिजनच्या ८२११ जणांचे नमुने तपासणीतून ५५६ जण पॉझिटिव्ह आढळले.
जिल्ह्यातील ९ हजार ७६७ जण उपचार घेत असून त्यातील १००८ जणांची प्रकृती चिंजाजनक आहे. यातील ८६४ जण ऑक्सिजनवर, तर १४४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू तर नवीन १६ जण उपचारास दाखल झाले आहेत.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १४९७६३
उपचार घेत असलेले ९७६७
कोरोनामुक्त झालेले १३५८५४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४१४२
पॉझिटिव्हिटी रेट ७.९०
रविवारी दिवसभरात
सांगली १६७
मिरज ४१
आटपाडी ४८
कडेगाव ११३
खानापूर ३६
पलूस १०५
तासगाव ५४
जत २६
कवठेमहांकाळ २९
मिरज तालुका ४९
शिराळा ३६
वाळवा १४८