सांगली : जिल्ह्यातील बाधितांची सरासरी संख्या कायम राहताना, गुरुवारी नव्याने ४० जणांना काेरोनाचे निदान झाले. दरम्यान, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २४ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सलग दुसऱ्यादिवशी चारजणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी ५० नव्या रुग्णांची नोंद होत आहे. गुरुवारी ४० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. पलूस तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी चौघांचा गुरुवारी मृत्यू झाला. यात सांगली शहर, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १७१७ वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या ३९० रुग्णांपैकी ६९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ६१ जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत ६५० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या १४३५ चाचण्यांमधून १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७१६५
उपचार घेत असलेले ३९०
कोरोनामुक्त झालेले ४५०५८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७१७
गुरुवारी दिवसभरात...
सांगली ७
मिरज ३
जत ८
कडेगाव ६
आटपाडी, खानापूर प्रत्येकी ५
कवठेमहांकाळ २
मिरज, शिराळा, तासगाव, वाळवा प्रत्येकी १