शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli : वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी 77 लाख 71 हजार रूपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:17 IST

कोवीड-19 करीता प्रस्तावीत केलेल्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देवैद्यकीय साधन सामुग्रीसाठी 77 लाख 71 हजार रूपयांचा निधीकोरोना बाधीत रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी होणार मदत

सांगली  : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे कोवीड-19 रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-20 अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी महाराष्ट्र कोवीड-19 करीता प्रस्तावीत केलेल्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याला आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल असा दिलासा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. जिल्ह्यात ज्या वैद्यकीय साधन सामुग्रीची आवश्यकता आहे, अशांचा आढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या निधीतून व्हेंटीलेटर, मल्टी पॅरा मॉनिटर, ईसीजी मशिन, सक्शन मशिन, ॲटोक्लेव्ह मशिन, आरओ प्लँट, स्टीम स्क्रबर मशिन, बॅटरी स्प्रेअर वुईथ फ्रॉगर मशिन , एन-95 मास्क, लॅटेक्स हॅण्डग्लोज, गॉगल्स, पीपीई किट आदि अद्ययावत साधन सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. तसेच ॲटोमेटेड न्युक्लिक ॲसीड एक्सट्रॅक्शन सिस्टीमसाठी 14 लाख 87 हजार रूपयांची मागणी प्रस्तावीत आहे.सदर वैद्यकीय साधन सामुग्रीमुळे कोरोना बाधीत रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार असून यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले. जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई च्या अधिष्ठाता व कोवीड-19 समिती अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली