कोयना-अलमट्टीत पाण्याबाबत समन्वय ठेवा--जिल्हाधिकाºयांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:18 AM2017-09-22T01:18:01+5:302017-09-22T01:18:40+5:30

Coordinate water in Koyna-Alamatti - information of the Collector | कोयना-अलमट्टीत पाण्याबाबत समन्वय ठेवा--जिल्हाधिकाºयांची सूचना

कोयना-अलमट्टीत पाण्याबाबत समन्वय ठेवा--जिल्हाधिकाºयांची सूचना

Next
ठळक मुद्दे : सांगलीत आंतरराज्य पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठकही पूरस्थिती आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रमाण मानून फ्लड लाईन सर्वेक्षण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सध्याचा पावसाचा जोर पाहता, सांगली जिल्ह्यात २००५ प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाºयांनी सतर्क रहावे, तसेच सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी गुरुवारी दिल्या.

अलमट्टी धरणाची पाणी पातळी नियंत्रणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकाºयांची आंतरराज्यीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार संजयकाका पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञा. आ. बागडे, अलमट्टी धरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. इनामदार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रावण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, सांगलीत २००५ मध्ये आलेला पूर हा १०० वर्षांतून एकदा आलेला पूर होता. त्यामुळे ही पूरस्थिती आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रमाण मानून फ्लड लाईन सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोयना ते सांगली हे अंतर १७५ किलोमीटर आहे. कोयना धरणातून २५००० क्युसेक वेगाने पाणी सोडले, तर ते सांगलीत पोहोचण्यास २७ तास लागतात. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कोयना व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांशी दैनंदिन समन्वय व सुसंवाद ठेवून पाणी पातळी धोकापातळीच्या वर जाऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी व आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी १३ आॅक्टोबरला होणाºया राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.
बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अलमट्टी व कोयना धरणाचे अधिकारी, सांगलीचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, परिवहन विभाग, तसेच वन विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

दोन्ही राज्यांतील अधिकारी रोज संपर्कात
अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले म्हणाले, सांगली पाटबंधारे विभागाकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून कोयना व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांकडून दररोज पाऊस, धरणाची पाणीपातळी, पाण्याचा करण्यात येणारा विसर्ग, धोकापातळी यांची माहिती घेतली जाते. सर्व धरणांची ही माहिती एकत्रितरित्या घेतली जाते. या विभागाने कृष्णा खोºयासाठी पूरस्थिती नकाशा तयार केला आहे. धरणे भरली तर पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून परस्परांच्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी अलमट्टी धरण व कोयना धरणाच्या अधिकाºयांनी धरणाची क्षमता, सद्यस्थितीतील पाणीपातळी, धोकापातळी यांची माहिती दिली.

Web Title: Coordinate water in Koyna-Alamatti - information of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.