शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतून २१९ देशांमध्ये पोस्टामार्फत पार्सल पाठविण्याची सोय

By अविनाश कोळी | Updated: April 6, 2024 16:33 IST

निर्यातदारांसाठीही स्वतंत्र केंद्राची उभारणी

सांगली : कोणतेही पार्सल सांगलीमधून जगाच्या कानाकोपऱ्यात सहज व माफक किमतीत पाठविण्याची सोय आता पोस्टामार्फत उपलब्ध झाली आहे. निर्यात उद्योगात असलेल्या उद्योजकांनाही हा एक चांगला पर्याय पोस्टाने या माध्यमातून उपलब्ध केला आहे.शिक्षण, उद्योग, व्यावसायाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धींगत झाले आहेत. जिल्ह्यातील बरिचशी मुले शिक्षण व नोकरीसाठी परदेशात असून त्यामुळे परदेशी पाठवल्या जाणाऱ्या पार्सलची वाढती संख्या वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेत ग्राहकांच्या सोयीसाठी पोस्टाने सांगलीत विशेष काऊंटर सुरू केले आहे. यामुळे पोस्ट आता कुटुंब व परदेशातील त्यांच्या नातेवाईकांसाठी सेतूचे काम करणार आहे.सांगलीत मुख्य पोस्ट कार्यालयात विशेष आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग काऊंटरचे उदघाटन गोवा परिक्षेत्राचे डाक सेवा निर्देशक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डाक घर निर्यात केंद्राचा लाभ जिल्हयातील उद्योजकांनी घ्यावा व आपल्या वस्तू थेट अंतराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहोचवून आपला उद्योग व्यापक लोकल ते ग्लोबल करावा. पार्सल काऊंटरचा लाभही ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन रमेश पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी प्रवर अधीक्षक गुरुदास मोंडे, मिरज रेल मेल विभागाचे अधीक्षक संजय देसाई, प्रवर डाकपाल श्रीमती वैशाली कापसे, सहाय्यक अधीक्षक निरंजन ग्रामोपाध्ये, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

निर्यातदारांसाठी स्वतंत्र केंद्रजिल्ह्यातील व्यावसायिक निर्यातदारांसाठी सांगली व मिरजेतील मुख्य पोस्ट कार्यालयात डाक घर निर्यात केंद्र सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील निर्यातदार आपल्या वस्तू परदेशात पाठवत आहेत. हे केंद्र अंतर्गत निर्यातदारांना ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन कस्टम क्लिअरन्स व डिजिटल डॉक्युमेंटेशन या सुविधा उपलब्ध करून देत आहे.

२१९ देशांमध्ये पार्सल पाठविण्याची सोयजगभरातील जवळपास २१९ देशात वाजवी दरात पार्सल पाठवण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध आहे. परदेशात शिक्षण व नोकरीनिमित्त राहणारे अने सांगलीकरांना दरवर्षी खासगी कुरिअर कंपन्यांमार्फत पार्सल पाठविले जातात. आता पोस्टाने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPost Officeपोस्ट ऑफिस