सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने (एमटीई) आज, रविवार पोलीस बंदोबस्तात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालातील चार एकर जागेचा ताबा घेतला आहे, अशी माहिती सोसायटीचे प्रा. श्रीराम कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुळातच ही संस्थेची जागा आहे. ती ताब्यात मिळविण्साठी तीन वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू होता, असेही कानिटकर यांनी सांगितले.ते म्हणाले की, मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा तीन वर्षांपासून सोसायटीच्या कार्यालयात सुरू आहे. या शाळेची इमारत बांधण्यासाठी सोसायटीचे असलेल्या वालचंद महाविद्यालयात चार एकर जागा निश्चित केली होती. मात्र महाविद्यालयातील व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यास विरोध केला होता. त्यांच्याकडून मारहाणीचे प्रकार घडले. सुरक्षारक्षकांना पिटाळून लावले. सोसायटीचा फलक फाडला. वास्तविक सोसायटीने स्थापन केलेले हे महाविद्यालय आहे, याची जाणीवही समितीच्या सदस्यांना राहिली आहे. महाविद्यालयातील शंभर एकर जागा आजही सोसायटीच्या नावावर आहे. महाविद्यालयातील व्यवस्थापन समितीवर सोसायटीचा एकही सदस्य नाही. ते म्हणाले की, सोसायटीला शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध होऊ नये, यासाठी त्यांना फार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. यावेळी सुरेंद्र चौगुले, अॅड. कविराज पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)न्यायालयात जाणार :वालचंद महाविद्यालयातील व्यवस्थापन समितीचे सदस्य रवी पुरोहित म्हणाले, एमटीई सोसायटीशी समितीचा कोणताही वाद नाही. सोसायटीच्या सदस्यांनी वाद निर्माण केला आहे. गेल्या ५० वर्षांत कधीच वाद झाला नाही. त्यांनी शाळेचे जे बांधकाम सुरू केले आहे, त्याविरुद्ध न्यायालयात जाणार आहे.
एमटीईने घेतला जागेचा ताबा
By admin | Updated: February 2, 2015 00:15 IST