शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यापासून वेतन नाही, सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By संतोष भिसे | Updated: February 23, 2024 16:26 IST

आर्थिक कोंडी, दोन कोटी रुपये अडकले

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ४०हून अधिक कंत्राटी कामगारांना नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. एका खासगी कंपनीकडून जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केेंद्रांत कंत्राटी स्वरूपात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे नऊ महिन्यांपासून जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वाहनचालक, आरोग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी अशा विविध संवर्गांतील सुमारे ४० कंत्राटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. मे २०२३ पासूनचे वेतन संबंधित कंपनीने जमा केलेले नाही. पैसेच नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. वेतनासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाकडून कंपनीकडे वेतन जमा करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सहा ते सात महिन्यांपासून शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीच आला नव्हता. त्यामुळे वेतन थांबले होते. वेतनासाठी दोन कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ९२ लाख रुपये काही दिवसांपूर्वी कोषागार कार्यालयात जमा झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचे वेतन पाच-सहा दिवसांत जमा होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, खासगी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासनाकडून निधीच आला नसल्याने वेतन झाले नव्हते. नुकतेच ९२ लाख रुपये जमा झाले आहेत. आठ दिवसांत नोव्हेंबरपर्यंतचे वेतन जमा होईल.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद