शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा; लागा कामाला, पूरपट्ट्यातील बांधकामे शोधायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:45 IST

नैसर्गिक नाले व ओतात पक्की बांधकामे उभी होत असताना त्यावर कारवाईचे धाडस ना महापालिकेने दाखविले, ना जिल्हा प्रशासनाने

सांगली : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा उभी राहात असताना दुसरीकडे पूरपट्ट्यात आपत्तीला निमंत्रण देणारी बांधकामे उभी राहात आहेत. कर्नाळ रस्ता, बायपास रस्ता, जुना बुधगाव रस्ता याठिकाणच्या नैसर्गिक नाले व ओतात पक्की बांधकामे उभी होत असताना त्यावर कारवाईचे धाडस ना महापालिकेने दाखविले, ना जिल्हा प्रशासनाने.  सांगली शहरात गेल्या १७ वर्षांत अनेकदा महापूर येऊन गेले. २००५ आणि २००६ च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले, ओत आणि पूरपट्टा यांच्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू झाली. त्यावेळी सामाजिक संघटनांनीही याविषयी आवाज उठविला होता. त्यामुळेच महापालिकेच्या ८ ऑगस्ट २००६ रोजीच्या महासभेत ठराव करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नैसर्गिक नाले व त्यांच्या बफर झोनमध्ये मिळकतींचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत व तसे प्रस्ताव आले तर ते स्पष्टपणे नाकारावेत, असा निर्णय झाला होता. याबाबतच्या सूचना नगररचना, गुंठेवारी विभागाला देण्यात आल्या होत्या.नियम असतानाही अशी बांधकामे झालीच तर ती काढून टाकावीत, असा स्पष्ट ठराव करण्यात आला होता. तरीही नियमांना हरताळ फासण्याचे काम सातत्याने होत गेले. एकाही अधिकाऱ्याला याबाबत विचारणा न झाल्याने याकामी सातत्य राखण्याचे काम महापालिकेच्या यंत्रणांनी केले.सांगलीत २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर २०२१ मधील महापुरावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपट्ट्यातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. शासन याबाबत ठोस निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले होते. पूर ओसरल्यानंतर दोन्ही नेत्यांची आश्वासनेही ओसरली. गेल्या सतरा वर्षांत उपाययोजना न होता, आपत्तीची तीव्रता वाढविणारी अतिक्रमणे प्रशासनाच्या कृपेने झाल्याचा नागरिकांमधून आरोप आहे. तरीही प्रशासन लक्ष देत नाही.ओत झाले गायबसांगलीच्या कर्नाळ रस्ता, बायपास व जुना बुधगाव रस्त्यावर मोठे ओत होते. गेल्या काही वर्षांत यात भर टाकून अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. हाॅटेल्स, ढाबे, निवासी इमारती, गॅरेज यांची बांधकामे होत आहेत. घरांची बांधकामेही मोठ्या प्रमाणावर झाली. भर टाकल्यामुळे ओत आत दिसत नाहीत.नाले मोजताहेत अखेरची घटका, एकच शिल्लकसांगलीत एकेकाळी १६ नाले होते. आता एकच बायपास रोडवरचा नाला शिल्लक आहे. अतिक्रमणांमुळे हा नालाही आता शेवटच्या घटका मोजत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर