शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कदायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
4
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
5
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
6
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
7
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
8
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
9
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
10
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
11
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
12
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
13
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
14
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
15
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
16
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
17
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
18
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
19
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
20
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही जनता त्यांना जागा दाखवून देईल : पृथ्वीराज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 23:58 IST

उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे.

सांगली - उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. सरकारचे हे अपयश उघडे पडू नये म्हणूनच प्रियंका गांधी यांना अटक करण्यातपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे.अशा कोणत्याही दडपशाहीला भीक न घालता काँग्रेसचा अन्यायाविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असेही शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले. या वेळी कॉंग्रेस शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले, पोलिसांकडून सर्व पदाधिकारी यांना अटक करण्यात आली.काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोनभद्रमध्ये पोलिसांनी केलेली अटक निषेधार्ह असून, भाजप सरकारने कितीही दडपशाही केली तरी त्यापुढे प्रियंका गांधी झुकणार नाहीत. भाजपाच्या या दंडेलशाहीविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.  प्रियंका गांधी यांच्या अटकेवर संताप व्यक्त करून पाटील म्हणाले की, सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्या पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी प्रियंका गांधी जात असताना अटक करणे हे दडपशाहीचेच लक्षण आहे. पीडित लोकांना भेटण्यास आडकाठी करून भाजप सरकार काय साध्य करु इच्छित आहे? पीडितांना भेटणे काही गुन्हा आहे का? असे प्रश्नही पृथ्वीराज पाटील यांनी विचारले आहेत. भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आज प्रियंका गांधी सोनभद्र येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारच्या आदेशाशिवाय अशी अटक होऊच शकत नाही. प्रियंका गांधी या देशाला कणखर नेतृत्व दिलेल्या इंदिरा गांधी यांच्या नात आहेत. इंदिराजींनाही जनता पक्षाच्या राजवटीत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत. सरकारविरोधात संघर्ष करून त्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली, तोच वारसा प्रियंका यांच्याकडे आहे. भाजप सरकारने अडवणूक केली, प्रशासनाच्या आडून दडपशाही केली तरी अशा कोणत्याही दडपशाहीला त्या भीक घालणार नाहीत आणि डगमगणारही नाहीत, असे पाटील म्हणाले.या वेळी आंदोलनत नगरसेवक मंगेश चव्हाण, जयदीप शिंदे, बिपीन कदम, अजित ढोले, भाऊसाहेब पवार, इरफान मुल्ला, सनी धोतरे, आयुब निशाणदार, चंद्रकांत पवार, पैगंबर शेख, विजय जाधव, नामदेव कस्तुरे, राजेंद्र कांबळे, अजित दुधाळ, अमित पारकर, योगेश राणे, सुधीर जाधव, मयुरेश पेडणेकर, अरुण पडसुळे, प्रसाद पाटील, शुभम बनसोडे, प्रमोद जाधव, सुशील गोटपगार, सचिन पाटील, सौराब साळुंके, विनायक कोळेकर, संग्राम चव्हाण, सचिन चव्हाण, प्रशांत ऐवले, हिरा कांबळे, प्रणिती पाटील, प्रदीप पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस व युवक काँग्रेस, सेवादल सर्व फ्रंटल पदाधिकारी उपस्थित होते.