शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

काँग्रेसचे दोन पं. स. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:26 IST

मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेले ते दोन सदस्य कोण

ठळक मुद्देमिरज पंचायत समिती : तालुक्यात खळबळ; उलटसुलट चर्चा

मिरज : मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेले ते दोन सदस्य कोण, याची चर्चा पंचायत समितीत सुरू आहे.मिरज पंचायत समितीत पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. गत निवडणुकीत दोन अपक्षांच्या पाठबळावर व बारा सदस्यांच्या बहुमतावर काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत पंचायत समितीत आ. सुरेश खाडे व आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने भाजपची सत्ता आली. सध्या सत्ताधारी भाजपचे बारा व विरोधी काँग्रेस, राष्टÑवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे दहा अशी सदस्यसंख्या आहे.

सत्तांतरानंतर पंचायत समितीत सातत्याने सत्तासंघर्ष दिसून येतो. सत्ताधारी भाजपमधील मतभेद व संघर्षाची संधी साधण्याचा प्रयत्न विरोधी काँग्रेस व राष्टÑवादी करीत आहे.उपसभापती निवडीत भाजप नेत्यांनी डावलल्याने बुधगावचे सदस्य विक्रम पाटील यांनी बंड केले. या बंडखोरीला दोन्ही काँग्रेसने बळ देऊन पाटील यांना उपसभापतीपदी बसविले. भाजपने मिरज मतदारसंघाला आ. सुरेश खाडे यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने मतदार संघातील राजकारणाची हवाच बदलली आहे. याचा प्रभाव विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत चिन्ह बदलून निवडणूक लढवावी लागली. निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले. प्रबळ नेतृत्वाचा अभाव व सत्तास्थान नसल्याने विकास साधायचा कसा, या विवंचनेने काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी लोकसभा निवडणूक कालावधित भाजपमध्ये प्रवेश केला. नेत्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नसला तरी, ते भाजपच्या मार्गावरून वाटचाल करीत आहेत. त्याला पंचायत समितीचे सदस्यही अपवाद नाहीत. सध्या मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य पक्षप्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असणारे हे दोन सदस्य कोण, याचीच चर्चा सध्या मिरज पंचायत समितीत सुरू आहे.

सदस्य संपर्कात असल्याचा दावालोकसभा निवडणुकीत खा. संजयकाका पाटील यांचा मताधिक्याने झालेला विजय, आ. सुरेश खाडे यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद यामुळे मतदार संघात भाजपचा प्रभाव वाढला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळी भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. स्थानिक गटाचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याने, त्यांच्याच गटाचे पंचायत समितीचे दोन सदस्यही पक्षप्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबत त्या दोन सदस्यांसोबत व त्यांच्या नेत्यांसोबत चर्चाही झाल्याचा दावा केला जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण