शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

काँग्रेस-राष्ट्रवादी युती होईल : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:22 IST

केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देआता हवा बदलली; लवकरच निर्णयआगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना करा

कडेगाव : केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार डॉ. पतंगराव कदम म्हणाले, काँग्रेस हा तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे. अनेक जय-पराजय काँग्रेस पक्षाने पचवले आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र आता हवा बदलली आहे. या सरकारचा कारभार जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे पूर्वीचे दिवसच चांगले होते, अशी लोकांची भावना झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली आहे. कडेगाव पलूस तालुक्यातही काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना जादा अधिकार दिले आहेत.

विकास कामांसाठी आता थेट ग्रामपंचायतीकडे निधी येत आहे. त्यामुळे सरपंचांना प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे. नवीन सरपंचांना कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यशाळा घेणार आहे.

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, पण कार्यवाहीस विलंब होत आहे. कर्जमाफीला जाचक निकष लावल्याने कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, असेही कदम यांनी सांगितले. आता जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होत आहेत. या गळीत हंगामातही सोनहिरा कारखाना ऊस दरात अग्रेसर राहील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना कराकडेगाव शहरात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. याची दखल घेऊन शहरात तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे तसेच नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना दिल्या.

...आता कारभाराकडे लक्षनूतन सरपंच आणि सदस्यांनी पारदर्शक, सक्षम व प्रभावीपणे कारभार करावा. अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. गावोगावी प्रचंड विकास कामे झाली आहेत. तरीही राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहे, असेही कदम म्हणाले.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली