लोकमत न्यूज नेटवर्क
संख : पेट्रोल, डिझेल दरासह महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकार विरोधात जतमध्ये काँग्रेसच्या वतीने आ. विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
सध्या लॉकडाऊनमुळे हातात काम नाही. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल १००, तर डिझेलचा ९१ रुपये दर झाला आहे. महागाईमुळे शेती करणाऱ्यांना परवडत नाही.
दैनंदिन वापरात येणारे गॅस, खाद्यतेल व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढीव दर केंद्र सरकारने कमी करावेत यासाठी सरकारला जाग येण्यासाठी काँग्रेसचे आ. विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनखाली जत येथील पंपासमोर घोषणा देऊन आंंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, बाबासाहेब कोडग, महादेव पाटील, तुकाराम माळी, राजू यादव, आकाश बनसोडे, सईसाब नदाफ, महिबूब सय्यद उपस्थित होते.