इस्लामपूर शहरातील मुख्य चौकातील सर्वच क्षेत्रांतील व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सोमवार, दि. ५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे; परंतु मंगळवार, दि. ६ रोजी इस्लामपूर शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. यावर पोलिसांनी काही व्यावसायिकांवर कारवाईही केली; परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बेधडकपणे सुरू ठेवली आहेत.
शहरात सलून वगळता इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, पानपट्ट्या, झेरॉक्स सेंटर, बुक सेंटर, हॉटेल, मॉल वजा छोटे बझार दिवसभर सुरू होते. बसस्थानक परिसरातही काही व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई केली; परंतु उपनगरातील सर्व दुकाने चालू होती. भाजी मार्केटमध्ये सोशल डिटन्स्टचा फज्जाच उडाला आहे. भाजी विक्रेत्यांचे इस्लामपूर पालिकेने नियोजनबद्ध आखणी करावी, जेणेकरून सोशल डिस्टिन्सचे नियम पाळले जातील. काही व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शासनाकडून मिनी लॉकडाऊन संबंधीची नियमावली स्पष्टपणे जाहीर करावी, जेणेकरून व्यापारी संभ्रम निर्माण होणार नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.