शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या; सांगली जिल्ह्यातील शेटफळे ग्रामसभेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:48 IST

आटपाडी : आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव आटपाडी ...

आटपाडी : आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी जोरदारपणे ईव्हीएमला विरोध नोंदविला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या.शेटफळे येथील बाजार पटांगणात ग्रामसभा मंगळवारी झाली. यावेळी माजी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. सी. पी. गायकवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, माजी उपसरपंच विजय देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामसेवक आर. एम. कोळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यावेळी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ग्रामसभेत ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा ठराव मांडला. त्यास एकमताने पाठिंबा देत मंजुरी देण्यात आली. तसेच राज्यातील मराठा कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा व त्याच्या नोंदी शोधण्याचे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

विकासकामांच्या योजनांचा आढावा..गावातील अंतर्गत गटार, रस्ते, पिण्याचे पाणी, वाढलेली चिलार झुडपे, नवीन बसगाड्या सुरू करणे, जलजीवन योजनेची कामे, घरकुल योजनेच्या कामाचा आढावा, कृती आराखडा, घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी आणि वसुली आदी प्रश्नांवर सभेत चर्चा झाली. किसनराव गायकवाड, राजेश जाधव, पाणी फाउंडेशनचे सुहास पाटील, संभाजी पाटील, वामनराव गायकवाड, डी. एन. गायकवाड, नामदेव गायकवाड, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीEVM Machineएव्हीएम मशीनgram panchayatग्राम पंचायत