लॉकडाऊनमध्ये सवलत, पण फाजील आत्मविश्वास नको, अन्यथा तिसरी लाट दूर नसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:54+5:302021-06-03T04:18:54+5:30

फोटो ०२ संतोष ०१ लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती. १. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत ...

Concessions in lockdown, but don't overconfidence, otherwise the third wave won't go away | लॉकडाऊनमध्ये सवलत, पण फाजील आत्मविश्वास नको, अन्यथा तिसरी लाट दूर नसेल

लॉकडाऊनमध्ये सवलत, पण फाजील आत्मविश्वास नको, अन्यथा तिसरी लाट दूर नसेल

Next

फोटो ०२ संतोष ०१

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मंगळवारी सांगलीतील बाजारपेठेत अशी गर्दी झाली होती.

१. संस्थात्मक विलगीकरणाकडे दुसऱ्या लाटेत पूर्णत: दुर्लक्ष झाले.

२. रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षेनुसार पुरेशा प्रमाणात झाले नाही.

३. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून येणाऱ्यांची चोख नाकेबंदी झाली नाही, ते फिरतच राहिले.

४. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर पूर्ण लक्ष व नियंत्रण राहिले नाही, ते बाहेर फिरत राहिल्याने सुपर स्प्रेडर ठरले.

५. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारात गर्दी ओसंडून वाहिली, नियमांचे उल्लंघन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोनाला उतार लागला, तशी १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाली आहे. पण कोरोना पूर्ण गेला या गैरसमजात राहिल्यास तिसऱ्या लाटेचे संकट कधीही येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. सवलत काळातील नागरिकांची बेफिकिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोना संकटाच्या खाईत ढकलू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखांचा आकडा पार केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने व गतीने दुसरी लाट फैलावली. एका दिवशी २२०० रुग्ण ही सर्वोच्च संख्या ठरली. त्यानंतर दररोज घसरण होत आहे. चार दिवसांपूर्वी ८१० रुग्ण ही दोन महिन्यांतील निचांकी रुग्णसंख्या ठरली. घसरणीचे आकडे येऊ लागल्याने नागरिकांत फाजील आत्मविश्वास निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उत्साहाला वेळीच आवर घातला नाही, तर तिसऱ्या लाटेचे वादळ जिल्ह्याचा उंबरठा ओलांडू शकते.

दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि लोकांनीही अनेक चुका केल्या. बाजारपेठा अंशत: खुल्या होताच गर्दी उसळत गेली. कोरोनाच्या नियमांना नागरिकांनी फाट्यावर बसवले. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केलेच नाही. होम आयसोलेशनमधील रुग्ण बिनधास्तपणे बाजारात फिरत राहिले. आता सवलत मिळाल्यावर याचीच पुनरावृत्ती झाली, तर तिसरी लाट दूर असणार नाही. ती अधिक तीव्र आणि गंभीर असेल याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

बॉक्स

प्रशासन गाफील नाहीच...

१. १ जूनपासून प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असली तरी नागरिकांना स्वैरपणे वावरता येणार नाही. प्रशासनाचे त्यांच्यावर काटेकोर लक्ष असेल.

२. महापालिकेची पथके शहरभरात लक्ष ठेवून असतील. सकाळी आकरानंतरही व्यवसाय सुरू राहिल्यास मोठ्या दंडाला तोंड द्यावे लागेल.

३. जीवनावश्यक वस्तुंशिवाय अन्य दुकाने उघडता येणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

४. जिल्हाभरात फौजदारी प्रक्रियेचे १४४ कलम लागू आहे. योग्य कारणाशिवाय बाहेर फिरण्यावर निर्बंध आहेत.

५. आदेशाचा भंग केल्यास दंड होईल, वारंवार भंग केल्यास दुकान पूर्ण साथरोग कालावधीत सील केले जाईल.

पॉईंटर्स

अनलॉक-पहिला - ४ ऑक्टोबर २०२० - एकूण कोरोनारुग्ण -३८,५१८, मृत्यू - १,४०३.

अनलॉक-दुसरा - १ जून २०२१ - एकूण कोरोनारुग्ण - १,१९,३७४, मृत्यू - ३,४५०.

Web Title: Concessions in lockdown, but don't overconfidence, otherwise the third wave won't go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.