शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

इस्लामपुरात संकलित करावरुन गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 4:43 PM

शहरात सध्या गाजत असलेल्या संकलित कराच्या विषयावरून सभागृहात गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, ही अन्यायी करवाढ का झाली, असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी संकलित कराच्या प्रश्नावर पूर्वीच्या सभागृहाने चूक केली तशी चूक या सभागृहात होणार नाही. हे सभागृह शहरातील नागरिकांना न्याय देईल, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्देइस्लामपुरात संकलित करावरुन गदारोळनगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा

इस्लामपूर : शहरात सध्या गाजत असलेल्या संकलित कराच्या विषयावरून सभागृहात गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, ही अन्यायी करवाढ का झाली, असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी संकलित कराच्या प्रश्नावर पूर्वीच्या सभागृहाने चूक केली तशी चूक या सभागृहात होणार नाही. हे सभागृह शहरातील नागरिकांना न्याय देईल, अशी ग्वाही दिली.नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच शहरात गाजत असलेल्या संकलित कराच्या प्रश्नावरुन गदारोळ माजला. बाबासाहेब सूर्यवंशी, आनंदराव पवार, वैभव पवार, अमित ओसवाल, शकील सय्यद, विक्रम पाटील यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, ही अन्यायी करवाढ का झाली, असा प्रश्न उपस्थित केला.मुख्याधिकारी प्रज्ञा पवार-पोतदार यांनी २००६-०७ ते २०१९ पर्यंत चतुर्थ वार्षिक कर आकारणी झालेली नाही. २००६-०७ ला १२ हजार मालमत्तांची मोजणी झाली होती. भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव करताना शासनाच्या सर्व अटी मान्य करुन तसा प्रस्ताव दिल्याने शासन निर्णयानुसार ही करवाढ झाल्याचे सांगितले. सेनेच्या शकील सय्यद यांनी खासगी ठेकेदार कंपनीने केलेल्या कर निर्धारणाची प्रशासनाने शहानिशा का केली नाही, असा ठपका ठेवला.

आनंदराव मलगुंडे यांनी कर आकारणीची जबाबदारी प्रशासनाची आहे. वैभव पवार, अमित ओसवाल यांनी चतुर्थ वार्षिक कर आकारणी दर चार वर्षांनी बंधनकारक असताना, १३ वर्षे ती का झाली नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. ही मोजणी न झाल्यानेच एवढा मोठा कराचा बोजा खासगी ठेकेदार कंपनीने नागरिकांवर टाकला आहे.

शेवटी नगराध्यक्ष पाटील यांनी या सर्व विषयाची सर्वंकष माहिती घेऊन जानेवारी महिन्यात विशेष सभा घेऊन नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत कर आकारणी होणार नाही, असे सांगून चर्चेवर पडदा टाकला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीislampur-acइस्लामपूर