करगणी : आटपाडी तालुक्यातील करगणी ते बनपुरी या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी कामे न करताच बिले काढली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी माहिती द्यावी, असे लेखी निवेदन आटपाडी तालुका मनसे वाहतूक शाखेचे अध्यक्ष दाजीराम खिलारी यांनी केले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
दरम्यान करगणीतून जाणारा चिंचघाट ते बनपुरी या मार्गाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले असून, बनपुरी ते करगणी या रस्त्यातील दोन किलोमीटरचे काम न करता ठेकेदाराने बिल घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही कोणतीही चौकशी न करता बिले कसे अदा केली? हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मनसेने म्हटले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मानसेने काम न करता बिले कशी अदा केली आहेत? कामाची पाहणी कोणी केली? व बिले कशी अदा केली, याची माहिती मागवली आहे.