शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक : अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:03 IST

उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देराजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक : अभिजीत चौधरी

सांगली : उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही, केबल, चॅनेल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्लेज यासह सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे.

राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण आणि पेड न्यूजवर ही समिती नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच विधानसभानिहायही माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे.जाहिरात पूर्वप्रमाणिकरण करून घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण (एमसीएमसी) समितीकडे सादर करावेत. उमेदवारांच्या सोयीसाठी प्रमाणनासाठी येणारे त्यांचे अर्ज विधानसभा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षातही स्वीकारले जातील.प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या 3 दिवस आधी समितीकडे अर्ज करावा. तसेच, इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय पक्षाच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी 7 दिवस आधी समितीकडे अर्ज करावा.डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, विहित नमुन्यातील अर्जासह प्रचार मजकुराची दोन प्रतीत साक्षांकित संहिता (स्क्रिप्ट), प्रचार मजकुराच्या दोन सीडी द्याव्यात. सीडी, प्रचार साहित्य निर्मिती कर्ता व प्रकाशकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, दिनांक सीडीमध्ये तसेच संहितेमध्ये असावे. सीडीमध्ये जुने चित्रीकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक आहे.अर्जामध्ये जाहिरात निर्मितीचा व प्रसारणाचा अंदाजित खर्च, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या, केबल, रेडिओ, सोशल मीडिया यावर करावयाच्या प्रक्षेपणासंबंधीतील तपशील, जाहिरात उमेदवाराच्या लाभासाठी करण्यात येत आहे किंवा राजकीय पक्षाच्या लाभासाठी करण्यात येत आहे, याबाबत सत्यापन, जर याप्रमाणे नसल्यास तशा आशयाचे प्रतिज्ञापन, सर्व प्रदाने धनादेश किंवा धनाकर्षने दिली जातील, याचे सत्यापन अर्जासोबत सादर करावे लागेल. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली