संस्थेचे कार्यवाह संजय धामणगावकर, ए. के. देशपांडे, मुख्याध्यापिका विनया पाठक, दयानंद लांडगे, मंजिरी सोपल, मीनाक्षी देशपांडे, मानसी केळकर, देविका चिप्पलकट्टी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होते. स्फूर्तिदायक गीतांच्या व संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार घालण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांचा फिटनेस वाढावा, यासाठी ऑनलाईन सुक्ष्म योग व ध्यान साधनेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संजय धामणगावकर यांनी सांगितले. क्रीडा विभागाच्या मंजिरी सोपल व हर्षदा बेडेकर यांनी संयोजन केले. तसेच शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका विनया पाठक यांनी आभार मानले.
शिवजयंतीनिमित्त मिरजेत विद्यार्थांचे सामुदायिक सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST