शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:06 IST

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे ...

ठळक मुद्देब्रम्हनाळ दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नाही; चौकशी होणार

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. यापुढे महापुरापासून बचावासाठी पूरग्रस्त गावात बोटी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या १७ जणांच्या मृत्यूस प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंत्री खाडे यांना विचारणा केल्यानंतर, या दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्लारी येथील भूकंपानंतर झालेल्या मदतकार्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी चांगल्या प्रकारे मदतकार्य केले.

पुराचे पाणी शिरल्यानंतर सर्वच ठिकाणी प्रशासनाने तातडीने बोटी उपलब्ध करून दिल्या. पुराची पातळी वाढत असताना पूरग्रस्त गावांतील अनेक ग्रामस्थांनी सुरुवातीस स्थलांतरास नकार दिला. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मात्र सर्वांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली. ब्रम्हनाळ येथे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त ग्रामस्थ बसल्याने दुर्घटना घडली. या दुर्घटनेची शासकीय पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त गावांना शासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० किलोमीटर रस्ते बाधित झाले असून या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने विनानिविदा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या दलित कुुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी दलित कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सुरेश खाडे यांनी सांगितले.अलमट्टी धरण जबाबदार नाहीसांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही. कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्यांना एकाचवेळी पूर आल्याने पाणी पुढे वाहून न जाता पात्राबाहेर पडले. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या योजनेचाही फेरआढावा घेण्यात येईल. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदीGovernmentसरकार