शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आयुक्तांनी मुलांसाठी शाळाच बदलली; काय केले त्यांनी नेमके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:39 IST

शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्दे सह्याद्रीनगरच्या शाळेचे रूपडे पालटले

सांगली : पापुद्रे निघालेल्या रंगहीन भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, जळमटलेले वर्ग, नीरस वातावरण, असे निराशादायी चित्र महापालिकेच्या अनेक शाळांत बघायला मिळते. पण आता ते बदलण्याचा निर्धार करीत आयुक्त नितीन कापडणीस यांनी सह्याद्रीनगर येथील शाळा क्रमांक २३ चे रूपडेच पालटले आहे. त्यांच्या कल्पकतेने ही शाळा बोलकी केली असून शाळेत सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू होणार आहेत.

महापालिकेच्या अनेक शाळा बदलत्या परिस्थितीत पटसंख्या टिकविण्यासाठी धडपडू लागल्या आहेत. एकूण ५० शाळा असून पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयुक्त कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यानंतर शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी सह्याद्रीनगर येथील विष्णुअण्णा बालमंदिर या शाळा क्रमांक २३ ची निवड करण्यात आली.

आज शाळेचे रूपडे बदलून गेले आहे. भिंती, छतावर चित्रे रेखाटली आहेत. प्रशस्त मैदान, खेळणी, संगीत कलेसाठी स्वतंत्र व्यवस्था, आऊटडोअर व इनडोअर गेम्स या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याचे पाणी, शंभर टक्के बेंच व्यवस्था, मुलांसाठी टॅब, डिजिटल क्लासरूम, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रगणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगीत खोली अशा सुविधा दिल्या आहेत.

सेमी इंग्लिशचे वर्ग यंदापासून सुरू होणारयंदापासून महापालिकेच्या १५ शाळांमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षक सेवकांना गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलांना मोफत गणवेश, पुस्तके दिली जातील. सेमी इंग्लिश शाळेत सुविधांसाठी दानशूर लोकांनीही पुढे यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.

महापालिकेच्या सह्याद्रीनगर येथील शाळेत सेमी इंग्लिश आणि डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना आव्हान देतील असे बदल शाळेमध्ये करण्यात आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाcommissionerआयुक्त