शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जमिनीवर बसून साधला बेघरांशी संवाद, कौशल्यानुसार काम देण्याची दिली ग्वाही

By अविनाश कोळी | Updated: April 23, 2024 16:10 IST

कौशल्यानुसार लाभार्थ्यांना काम देण्याची ग्वाही

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी महापालिकेच्या सावली निवारा केंद्रास भेट देऊन येथील बेघरांशी संवाद साधला. याठिकाणी सेवा-सुविधांचा आढावा घेतानाच बेघरांना कौशल्यानुसार काम देण्याची ग्वाही दिली.आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी केंद्रास भेट दिली. यावेळी निवारा केंद्रातील बेघर लोकांशी गुप्ता यांनी खाली जमिनीवर बसून संवाद साधला. अनेक शासकीय अधिकारी बऱ्याचदा उभ्या उभ्याच विभागांना भेट देतात किंवा केबिनमधील पाहुणचार घेऊन जातात. नव्या आयुक्तांनी बेघरांना जागेवरून न उठवता त्यांच्याजवळ बसून संवाद साधला. निवरा केंद्रात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी दिली.बेघर केंद्रातील लाभार्थ्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्यांना काम उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. यावेळी ज्योती सरवदे, मतीन अमीन, मुस्तफा मुजावर उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली