शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मृत कोविड कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना आयुक्तांकडून भाऊबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:57 IST

diwali, Muncipal Corporation, commissioner, Sangli सर्वत्र दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र सन्नाटा होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रसंगी कुटूंबांना दिलासा देण्याचे काम महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करत भाऊबीजेची ओवाळणी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले होते.

ठळक मुद्देसांगलीत मृत कोविड कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना आयुक्तांकडून भाऊबीज महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब गहिवरले

सांगली : सर्वत्र दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा होत असताना सांगली महापालिकेच्या कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात मात्र सन्नाटा होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रसंगी कुटूंबांना दिलासा देण्याचे काम महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करत भाऊबीजेची ओवाळणी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले होते.कोरोनाच्या संसर्गात गेली आठ महिने महापालिकेची कर्मचारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावित आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यापासून ते मृत कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सारी जबाबदारी कर्मचार्‍यांनी पार पाडली आहे. अशातच महापालिकेच्या अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात १० कर्मचार्‍यांचा कोरोनाने बळी घेतला.यंदा या कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. कर्ता माणूस हिरावल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटूंबियांना दिलासा देण्याचे काम आयुक्त कापडणीस व उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले. भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी या कुटूंबाला भेट दिली. त्यांच्यासोबत भाऊबीज आणि दिवाळी साजरी केली. आम्ही आपल्या सोबत आहोत असा धीर दिला. आयुक्तांनी दिलेल्या आधारामुळे महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब भारावून गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तDiwaliदिवाळी