फोटो ओळ : जत तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ व भूमिपूजन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान सडक योजना, आमदार स्थानिक निधीतील रस्त्यांच्या मंजूर कामांचा प्रारंभ व भूमिपूजन आ. विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. एकाच दिवशी दहा कामांचा प्रारंभ केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जुना राम १२५ ते तिप्पेहळ्ळी इजीमा १८४ रस्ता सुधारणा करणे, रेवनाळ ते रेवनाळ रस्ता, शेगाव ते चपरासवाडी रस्ता, शेगाव ते अंतराळ रस्ता सुधारणा करणे, शेगाव ते पाटील व्हनमाने वस्ती सुधारणा करणे, बागलवाडी ते काशिलिंगवाडी रस्ता सुधारणा करणे, वाळेखंडी ते महादेवखडीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये फरशी पूल बांधणे, वाळेखंडी ते जाधववाडी सुधारणा करणे, बेवनूर ते शिंदे काळवळ मळा रस्ता, मौजे प्रतापूर ता.जत येथील मायक्का मंदिरासमोर ग्रामपंचायत
मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, सरदार पाटील, रवींद्र सावंत, मारुती पवार, नाथा पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे उपस्थित होते.