सांगलीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:28 AM2021-05-18T04:28:08+5:302021-05-18T04:28:08+5:30

सांगली : शहरातील गरीब नवाज मशिदीसमोर सुरू असलेला वाद मिटवताना महिला पोलिसाला धक्काबुक्की झाल्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. ...

Combing operation of Sangli police | सांगलीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

सांगलीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Next

सांगली : शहरातील गरीब नवाज मशिदीसमोर सुरू असलेला वाद मिटवताना महिला पोलिसाला धक्काबुक्की झाल्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सोमवारी शहरातील विविध भागांत दीडशे पोलिसांच्या फौजफाट्याने कोम्बिंग ऑपरेशन राबवून यातील संशयितांचा शोध घेतला. यात १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून आसिफ बावा याच्यासह ४० ते ५० जणांवर यापूर्वीच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गरीब नवाज मशिदीसमोर शनिवारी दोघांमध्ये भांडण सुरू होते. याचवेळी तिथून जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी यात हस्तक्षेप करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी असिफ बावा याने ४० ते ५० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविला होता. यावेळी जमावातील एकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली होती. त्यानंतर असिफ बावासह त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संशयितांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अजित टिके, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात शहरातील बदाम चौक, नळभाग, काळा मारुती चौक, शेवाळे गल्लीसह संजयनगर परिसरातील रामरहीम कॉलनीतही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मोहिमेत १५ पोलीस अधिकाऱ्यांसह १५० पोलिसांचा समावेश होता.

दरम्यान, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनीही माेहिमेदरम्यान उपस्थित राहत तपासाच्या सूचना दिल्या.

चौकट

पोलिसांना दमदाटी खपवून घेणार नाही

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, जनतेच्या सुरक्षेसाठीच पोलीस कर्तव्यावर असतात. अशा परिस्थितीत पोलिसांवरील हल्ले, शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

Web Title: Combing operation of Sangli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.