शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अडिचशे वर्षाच्या इतिहासाच्या माहितीचा संकलन, सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:50 PM

श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सांगलीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा सुमारे अडिचशे वर्षांचा इतिहास जाणून घेतला. विद्यार्थिनींचा हा ह्यहेरिटेज वॉकह्ण सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर घडविणारा ठरला.

ठळक मुद्देअडिचशे वर्षाच्या इतिहासाच्या माहितीचा संकलनसांगलीच्या इतिहासाची रम्य सफर

सांगली : श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सांगलीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा सुमारे अडिचशे वर्षांचा इतिहास जाणून घेतला. विद्यार्थिनींचा हा ह्यहेरिटेज वॉकह्ण सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर घडविणारा ठरला.गरवारे कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व मोडी प्रशिक्षण वगार्मार्फत या इतिहास अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख प्रा. उर्मिला क्षीरसागर आणि मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.अनेकजण राज्यातील, देशातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात. पण, आपल्याच जिल्हयाचा, गावाचा इतिहास माहिती नसतो. हा स्थानिक इतिहास जाणून घेण्यासाठी या आगळ्या वेगळ्या सफरीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातंर्गत विद्यार्थिनीना गणेशदुर्ग भुईकोट किल्ला, किल्ल्यामध्ये असणारा दरबार हॉल, संस्थानकालीन प्रशासकीय इमारती, बुरुज, खंदक, काटे दरवाजा अशा विविध वास्तू दाखविण्यात आल्या.

या वास्तूंची माहिती इतिहास अभ्यासक कुमठेकर यांनी दिली. सांगलीचा इतिहास, पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे कार्य, गणेश दुर्ग किल्ल्याचा इतिहास, राजवाडा परिसरात असणारे ऐतिहासिक अवशेष यांची माहिती कुमठेकर यांनी दिली. मराठा कालीन बांधकामाची वैशिष्टये, लाकडावरील कोरीव काम, संस्थानकालीन इमारतीवर असणारा ब्रिटीश स्थापत्य शैलीचा प्रभाव अशी माहिती या वेळी देण्यात आली.राजवाडा परिसरात असणाऱ्या सांगली वस्तू संग्रहालयालाही भेट देण्यात आली. तेथील ऐतिहासिक व कलात्मक वस्तू, नामवंत चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचा ताम्रपट, सवाई माधवराव पेशव्यांचे जोडे, चंदनाच्या लाकडावरील कोरीव काम अशा नानाविध ऐतिहासिक वस्तू पाहून विद्यार्थिनी थक्क झाल्या. सांगली शहर आणि परिसरात गेल्या २५० वर्षांत झालेल्या ऐतिहासिक घटना, घडामोडीची माहिती सांगणारा हा एक ह्यहेरिटेज वॉकह्ण च होता. भूतकाळाची रम्य सफर या अभ्यास सहलीतून विद्यार्थिनींना घडली.

टॅग्स :tourismपर्यटनSangliसांगली