शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर

By संतोष भिसे | Updated: September 29, 2022 13:39 IST

पुढील टप्प्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पीएनजी प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रयत्न सुरु आहेत.

सांगली : सांगली आणि सातारा जिल्ह्यांना वाहनांसाठी सीएनजी पुरविणारे येलूर (ता. वाळवा) येथील उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे पुरेसा सीएनजी उपलब्ध होऊ लागला आहे. सध्या दोन्ही जिल्ह्यांतील १४ पंपांवरुन दररोजची विक्री १० हजार किलोंवर पोहोचली आहे.भारत पेट्रोलियमद्वारे सीएनजी पुरवठ्याचा प्रकल्प गतीने पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात वाहनांसाठी गॅसची योजना प्रत्यक्षात आली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, कासेगाव, येलूर, वाघवाडी व समडोळी येथील पंपांवर सीएनजीची विक्री पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. कर्नाल (ता. मिरज) येथील पंप ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल. त्याशिवाय पुणे-बेंगलुरु महामार्ग व सातारा जिल्हा मिळून एकूण १४ पंपांवर विक्री पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. आतापर्यंत टॅंकरमधून पंपांना सीएनजी पुरविला जायचा. मागणीइतके टॅंकर उपलब्ध नसल्याने टंचाई निर्माण व्हायची. पंपांवर टॅंकर येताच काही तासांतच सीएनजी संपायचा, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.सध्या टंचाई संपुष्टात आली आहे. येलूर येथील उपकेंद्रावर ३० टॅंकर उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी नोंदविताच टॅंकर उपलब्ध होत आहेत. गॅससाठी रांगा लावाव्या लागत नसल्याचे चित्र आहे. दाभोळहून बेंगळुरुला जाणाऱ्या गॅस वाहिनीमधून येलूर उपकेंद्रासाठी पुरवठा घेण्यात आला आहे, त्यामुळे मुबलक पुरवठा होत आहे.

आता घरगुती पुरवठ्यासाठी प्रयत्नपुढील टप्प्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पीएनजी प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रयत्न सुरु  आहेत.  महापालिका क्षेत्रात १२ हजार २०७ घरांत जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. तेथे गॅस पुरवठ्यासाठी मिरजेतील उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तोपर्यंत येलूर उपकेंद्रातून पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :Sangliसांगली