शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यात बंद

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

निेषेध फेऱ्या : संशयितांच्या अटकेची आंदोलनकर्त्यांकडून मागणी, कुंडलमध्ये मूक मोर्चा

सांगली : श्रमिक, कष्टकऱ्यांचा आधारवड आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यात आज (रविवारी) विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. निषेधफेरी, मूकमोर्चा काढून संशयितांच्या अटकेची मागणी करण्यात आली. इस्लामपूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज इस्लामपूर शहरात बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सायंकाळपर्यंत बंद होते. पानसरे यांच्या हत्येचा निषेध व हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आज विविध पक्ष, संघटना व परिवर्तनवादी चळवळींनी बंदची हाक दिली होती. आजचा रविवारचा आठवडा बाजारही सायंकाळनंतर भरला. वाळवा : वाळव्यात आज उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सरपंच गौरव नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पानसरे यांना आदरांजली वाहिली. आज वाळवा, शिरगाव, नागठाणे, पडवळवाडी, सूर्यगाव, अहिरवाडी येथे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. कवठेमहांकाळ : कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ पकडावे, अशी मागणी करत कवठेमहांकाळ शहरातून आज शेकडो पुरोगामी कार्यकर्त्यांनी शहरातील मल्लिकार्जुन मंदिरापासून निषेध फेरी काढली. यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, नामदेवराव करगणे, सफाई कर्मचारी संघटनेचे दादासाहेब झुरे, साधना कांबळे, बाळासाहेब रास्ते, सुभाष कोष्टी आदींची भाषणे झाली. किशोर वाघमारे, रा. बा. संकपाळ, बबूताई वाघमारे, अंकुश रास्ते, हणमंत माने, सुनील वाघमारे, प्रा. बाबासाहेब भेंडे, अनिल लोंढे ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. कडेगाव : गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी कडेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, आरपीआय, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. कडेगावसह अन्य गावांमध्येही बंद पाळण्यात आला.दिवसभर कडेगाव येथील दुकाने तसेच बाजारपेठ बंद होती. कडेगाव येथील बसस्थानक चौकात सुरेश देशमुख, सुरेश निर्मळ, जीवन करकटे यांनी आदरांजली वाहिली. श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. कडेपूर, चिंचणी येथे गोविंदराव पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली.तासगाव : पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बंदला तासगावात प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंदच होती. रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ५ नंतर काही ठिकाणी दुकाने सुरु करण्यात आली. मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. बंद शांततेत पाळण्यात आला. कवठेएकंद : कवठेएकंद येथे गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी कवठेएकंदमध्ये बंद पाळण्यात आला. जुनी चावडी येथे सर्वपक्षीयांतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव लगारे, प्रा. विजय कोगनोळे, सूर्यकांत पाटील, राजाराम माळी, अशोक घाईल, उत्तम कांबळे, दीपक जाधव, संतोष आठवले, सरपंच शरद लगारे, कॉ. वसंत कदम, किसना शिरतोडे, बी. डी. तपासे, वसंत तपासे यांनी पानसरेंच्या हत्येचा निषेध केला. निषेध फेरीत शंकरराव माळी, सिराज मुजावर, जयवंत माळी, प्रदीप कांबळे, दत्तात्रय पुजारी, अशोक माळी, प्रवीण घाईल, सहभागी झाले होते. शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना कार्यस्थळावर पानसरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कारखान्याचे संस्थापक संचालक रंगराव बाळाजी पाटील (रा. कोळे) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, संचालक पोपटराव जाधव, अशोकराव थोरात, बाबासाहेब महिंंद, अ‍ॅड. उत्तमराव पाटील, संग्राम पाटील, अजित पाटील, अनुप पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग मेटकरी, प्र. कार्यकारी संचालक अशोकराव नलवडे, सेक्रेटरी उदय मोरे, तात्यासाहेब मोहिते उपस्थित होते. पलूस : कॉ. गोविंद पानसरे यांना कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसह परिवर्तनवादी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. ज्येष्ठ प्रबोधक व्ही. वाय. पाटील, कॉ. मारुती शिरतोडे यांची भाषणे झाली.किर्लोस्करवाडी : कॉ. गोविंद पानसरे यांना रामानंदनगर येथे विविध संघटनांतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी व्ही. वाय. पाटील, अख्तर पिरजादे, संदीप नाझरे, बी. बी. खोत, शहाजी चव्हाण, प्रा. उध्दवराव सदामते, आदम पठाण, राजाभाऊ माने, अकबर पठाण, गणपतराव सावंत, हंबीरराव मोरे, उत्तम सुतार, संतोष गायकवाड, सुहास वड्डीकर उपस्थित होते. (वार्ताहर)एन. डी. पाटील यांना संरक्षणाची मागणीकुंडल येथे सर्वपक्षीयांच्यावतीने रविवारी प्रमुख मार्गावरुन मूक मोर्चा काढून ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा निषेध करण्यात आला. खारगे चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. शोकसभेत क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र लाड, सर्जेराव पवार, कॉ. शहाजी पवार, महादेव लाड, मारुती शिरतोडे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी शोकसभेत करण्यात आली. श्रीकांत जाधव, हिंमतराव पवार, कॉ. अर्जुन बोबडे, डॉ. व्ही. डी. पाटील, अ‍ॅड. दीपक लाड, विश्वास जाधव, मोहन लाड, पोपटराव सूर्यवंशी, श्रीकांत माने, नंदकुमार लाड, सचिन आवटे उपस्थित होते.