शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

हातातलं घड्याळ, कमळातले भुंगे ठरवणार जतचा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:39 IST

श्रीनिवास नागे विधानसभेच्या जत मतदारसंघात भाजपचं त्रांगडं झालंय. आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात त्यांच्याच चिल्ल्या-पिल्ल्यांनी उठाव केलाय म्हणे! अगदी काही ...

श्रीनिवास नागेविधानसभेच्या जत मतदारसंघात भाजपचं त्रांगडं झालंय. आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात त्यांच्याच चिल्ल्या-पिल्ल्यांनी उठाव केलाय म्हणे! अगदी काही दिवसांपर्यंत त्यांच्यासमोर ‘साहेब, साहेब’ म्हणून झुकणाऱ्या नेत्यांनी आता ‘साहेब नकोत’ म्हणून घोशा लावलाय. कुणालाच न जुमानणाºया आणि मनगटशाहीवर नितांत श्रद्ध असणाºया जगतापांना असली पेल्यातली वादळं नवी नाहीत. पण यावेळी बंडकऱ्यांना वरूनच वरदहस्त आहे, म्हटल्यावर त्यांनीही सबुरीनं घेतलंय.यावेळी काँग्रेस-राष्टÑवादी-भाजपसह सगळ्याच पक्षांतली पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणं उगवणारी विकाऊ फळी काँग्रेसच्या मागं जाणार, विलासराव जगतापांच्या वळचणीला जाऊन बसणार, की यंदा पुन्हा ‘तेरा दिवसांचा नवा आमदार’ करणार हे पाहणं म्हणजे दे-दणादण ‘साऊथ इंडियन’ स्टाईलच्या चित्रपटाचा आनंद घेण्यासारखं मनोरंजक ठरणार आहे.जत म्हणजे जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका. दुष्काळामुळं इथलं राजकारण पाण्याभोवती फिरणारं. त्यात कधीकधी तालुक्याच्या विभाजन-त्रिभाजनाची फोडणी पडते. आता जत शहरापर्यंत म्हैसाळ योजनेचं पाणी आलंय, पण पूर्वभाग नेहमीच कोरडाठाक. कधी तिथल्या ४२ गावांचा पाणीप्रश्न घेऊन कुणी लढतं, तर कधी ६४ गावांना पाणी देणार म्हणून कुणी उभं राहतं. पण हे मुद्दे ऐन निवडणुकीतच येणारे!जगतापांनी ज्यांना हात दिला, त्या तम्मणगौडा रवी-पाटील (हे जिल्हा परिषदेत जगतापांमुळंच सभापती झाले, हं!), प्रकाश जमदाडे (यांची पत्नी पंचायत समितीत उपसभापती होती. जगतापांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला.), डॉ. रवींद्र आरळी (हे निष्ठावंत तथा भाजपेयी) आदी मंडळींनी बंड केलंय. जगतापांचं रोखठोक बोलणं आणि सत्ता पंखाखाली घेणं पक्षातल्या दुढ्ढाचार्यांना आणि वरिष्ठ नेत्यांनाही न पटणारं. त्यात खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांचा जुना याराना. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि सांगली-मिरजेतल्या रिमोट कंट्रोलवाल्यांनीच या बंडाला खतपाणी घातलंय, अशी कुजबूज ऐकू येतेय. चंद्रकांतदादा ज्या बालगाव मठात जातात, तिथल्या अमृतानंद महास्वामींचं नावही उमेदवार म्हणून पुढं आणलं गेलं, पण नंतर त्यांना थांबवलं गेलं. बागडेबाबांचे शिष्य तुकाराम महाराज यांचं नाव आता पुढं आलंय. त्यांनी पूर्वभागातल्या पाण्याच्या प्रश्नावर उचल खाल्लीय. राजकारणात महाराज-स्वामींची चलती असल्यानं त्यांच्या सुप्त इच्छा उफाळून आल्या असाव्यात. शेजारच्या सोलापुरातलं उदाहरण ताजं आहे म्हणा!मतदारसंघ २००९ मध्ये खुला झाल्यावर तेव्हा राष्टÑवादीत असलेले ‘किंगमेकर’ जगताप ‘किंग’ होण्यासाठी पुढं आले, पण काँग्रेस-राष्टÑवादीनंच ‘गेम’ केली. काँग्रेसच्या १३ पदाधिकाºयांनी राजीनामे देऊन भाजपचं कमळ हाती घेतलं, तर राष्टÑवादीच्या आर. आर. पाटील गटानं पाठ फिरवली. परिणामी तेव्हा ऐनवेळी भाजपमध्ये जाऊन तिकीट मिळवलेल्या प्रकाश शेंडगेंना केवळ तेरा दिवसांत आमदारकीचा गुलाल लागला. तो इतिहास माहीत असल्यानं २०१४ मध्ये जगतापांनी भाजपची उमेदवारी मिळवली आणि विरोधात गेलेली मंडळीच ‘खूश’ करून खिशात घातली. भाजपचे जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत, भाजपनं तिकीट कापल्यानं राष्टÑवादीकडून लढलेले प्रकाश शेंडगे यांच्यात सामना झाला. तो जगतापांनी मारला. पाण्याच्या राजकारणाला जातीय समीकरणांची, आर्थिक गणितांची जोड दिली की, जतमध्ये जिंकता येतं, हे आता सिद्ध झालंय.जतच्या काँगे्रसमध्ये पतंगराव कदम, प्रकाशबापू, मदन पाटील असे तीन गट होते. आता कदम गट तेवढा राहिलाय. मदनभाऊ गटाच्या सुरेश शिंदेंनी राष्टÑवादीची वाट धरलीय. काँग्रेसकडून विक्रम सावंत यांनी पुन्हा शड्डू ठोकलाय. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांचे ते मावसबंधू. त्यामुळं त्यांना कदम गटाचं मोठं पाठबळ. पण जत नगरपालिकेतल्या भांडणांमुळं राष्टÑवादीचे शिंदे, माजी सभापती मन्सूर खतीब विरोधात, तर तिकडं उमदी परिसरातले राष्टÑवादीचे बडे नेते चन्नाप्पा होर्तीकरांशीही सावंतांचा उभा दावा. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होर्तीकरांना सावंतांनी पाडलेलं. सावंतांना राष्टÑवादीची साथ द्यायची की नाही, हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवणार. पण सावंतांना खरी आशा असू शकते, ती कमळातल्या नाराज भुंगेºयांकडून येणाºया मकरंदाची...जाता-जाता : ‘आठवडा आमदार’ (म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा मुंबईतून जतला येणारे आमदार) असं म्हणून ज्यांना हिणवलं जायचं, ते प्रकाश शेंडगे आता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत, तर ‘वंचित’चे महासचिव गोपीचंद पडळकर यांनीही संपर्क वाढवलाय. धनगर समाजाची लक्षणीय मतं जतचा आमदार ठरवण्यात कामी येतात. लोकसभेला गोपीचंद पडळकरांनी जतमधून दुसºया क्रमांकाची म्हणजे ५३ हजार मतं खेचली होती. पडळकरांचा ‘वंचित फॅक्टर’ जतमध्ये विधानसभेच्या निकालावरही परिणाम करणार म्हणायचं...ताजा कलम : भाजपमध्ये दगाफटका झालाच तर राष्टÑवादीचं घड्याळ हातावर बांधून रिंगणात उतरायलाही जगताप मागंपुढं पाहणार नाहीत. नाहीतरी ते जयंत पाटील यांच्याच जुन्या गटाचे. पण मराठा समाजाची व्होट बँक लक्षात घेता, भाजप पायावर कुºहाड मारून घेणार नाही, हेही खरं...