शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

दिघंचीकरांच्या हाती घड्याळाची चावी

By admin | Updated: February 12, 2017 23:11 IST

राजकीय समीकरणे बदलली : आटपाडी तालुक्यात जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकीत चुरस

अविनाश बाड ल्ल आटपाडीआटपाडी तालुक्यात जि. प. आणि पं. स.ची निवडणूक चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. तरीही दिघंची जि. प. गटातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. तालुक्यात केवळ दिघंची जि. प. गटात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नशीब अजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ तालुक्यात रुसणार की हसणार? हे दिघंचीकर ठरविणार आहेत.गेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार अनिल बाबर हे दोन गट एकत्रितपणे राष्ट्रवादीच्या घड्याळाला चावी देत होते. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले होते. आता नेमकी उलट परिस्थिती झाली आहे. त्यावेळी सध्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून कडवी झुंज दिली होती. त्यांच्याच खांद्यावर आता राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. अस्तित्वाची लढाई म्हणूनच ते मैदानात उतरले आहेत. तसेच राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन राजकीय भूकंप घडविला आणि आ. अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील यांनी ९,८६४ मते मिळवली होती, तर अपक्ष जयमाला हणमंतराव देशमुख यांनी ४,५१९ मते मिळविली होती. त्यावेळी १९,६४५ जणांनी मतदान केले होते.दिघंची पंचायत समिती गणात अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या हणमंतराव देशमुख यांना ३,४२७ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या बळवंत सुदामा मोरे यांनी राष्ट्रवादीतून ४,६७६ मते मिळवून विजयश्री मिळवली होती. त्यावेळी दिघंची गणातील एकूण ९,४२६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. निंबवडे गणातील १०,२४६ मतदारांनी एकूण ६ पैकी राष्ट्रवादीच्या भीमराव वाघमारे यांना ५,०२३ मते देऊन पसंती दिली होती.आता यापैकी किती मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. राष्ट्रवादीने जि. प. गटासाठी अतुल बापू जावीर, दिघंची पंचायत समिती गणासाठी उषा कलाप्पा कुटे आणि निंबवडे गणातून ज्योती दीपक जाधव यांना उमेदवारी दिली आहे. यांची गाठ भाजपच्या मोहन चित्रांगण रणदिवे (दिघंची जि. प.), पुष्पा जयवंत सरगर (निंबवडे गण), उज्ज्वला श्रीरंग शिंदे (दिघंची गण) यांच्याशी आहे. शिवसेनेचे अण्णा श्रावणा रणदिवे (जि. प.), भामाबाई पांडुरंग शिंदे (दिघंची पं. स.), गिरीजाबाई बाळासाहेब मोटे (निंबवडे पं. स.), तर काँग्रेसमधून अनिल वाघमारे (जि. प.), बानुबी आत्तार (दिघंची पं. स.) नशीब अजमावत आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षातून नवनाथ रणदिवे यांच्यासह बळीराम वाघमारे, मानाजी ठोंबरे, साहेबराव चंदनशिवे ही अपक्ष मंडळी आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदार राजाची किती पसंती मिळणार, याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीचे भवितव्य हणमंतरावांच्या हातीराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख हे माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे स्नेही आहेत. त्यामुळे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यापेक्षा आबांशी त्यांची जवळीक. राष्ट्रवादीच्या या तालुक्यात पक्षाला केवळ चार उमेदवार मिळाले आहेत. आटपाडी जि. प. गटातून सादिक खाटीक यांची उमेदवारी आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांना आटपाडीत येऊन सभा घ्यायची म्हटले तरी, तालुक्यात पक्षाचे उमेदवारच नाहीत. राष्ट्रवादीच्या अशा वाईट काळात हणमंतराव देशमुख पक्षाचा गड लढविणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांवरच राष्ट्रवादीचे तालुक्यातील भवितव्य अवलंबून आहे.