शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

सांगलीत सुविधांचा अभाव : बाहेरून ‘झकास’ आणि आतून मात्र ‘भकास’

सांगली : वर्षाला पाच कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मार्केटच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्याची विल्हेवाट न लावल्याने बकालपणा आला आहे. बाहेरून ‘झकास’ दिसणारे मार्केट आतमधून ‘भकास’ झाल्याने व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर रस्त्यावर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णुअण्णा पाटील फळ मार्केट आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक बाजारपेठेत फळांची आवक-जावक होण्यासाठी या फळ मार्केटला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नेहमीच व्यापाऱ्यांसह शेतकरी व वाहनांची मोठी गर्दी मार्केटमध्ये दिसून येते. व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये फळांची खरेदी-विक्री व्यवहार होत असतात, तर दक्षिणेकडील शेडमध्ये कांद्यासह इतर फळांची आवक होते. या शेड परिसरात व्यापाऱ्यांनी स्वत: काही प्रमाणात स्वच्छता ठेवली असली तरी फळांची आवरणे आणि पाल्यामुळे बाहेर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे मधोमध असलेला कचरा जाळण्यात येत असला तरी परिसरात असणारी व्यापाऱ्यांची दुकाने लक्षात घेता, त्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. मार्केटच्या पूर्वेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व कचऱ्यातून खताची निर्मिती करण्याच्या हेतूने पत्र्याच्या शेडमध्ये गांडूळ खताचे दोन प्लांट तयार करण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. त्या शेजारीच मार्केटमधील कुजलेली खराब फळे व त्याची आवरण व फळांच्या पेटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या गवताचा ढीग लागला आहे. कुजलेली फळे तेथेच टाकून देण्यात आल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. पाऊस झाल्यानंतर याचा त्रास होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांचा फळमार्केटमध्ये राबता असताना, त्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचण निर्माण होत आहे. स्वच्छतागृह नसल्यानेही परिसरातील घाणीत व दुर्गंधीत वाढच होत आहे. बाजार समितीला दरवर्षी कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी) गांडूळ खताचा प्रकल्प धूळ खात...फळमार्केटमध्ये पूर्वेला कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र, देखभालीअभावी तो बंद आहे. मार्केटमध्ये निर्माण होणारा कचरा व टाकाऊ फळांची संख्या लक्षात घेता बाजार समितीच्या प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक आहे.