शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत हाणामारी, निविदेवरून वाद

By शीतल पाटील | Updated: January 20, 2023 20:38 IST

पोलिसांची मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात

सांगली: महापालिकेच्या आवारात शुक्रवारी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत हाणामारी झाली. स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपचे शहर सचिव अतुल माने यांच्यातील मारामारीनंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत माने यांना पोलिस ठाण्यात आणले. नाल्याच्या निविदेतून वाद होऊन मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी महापालिकेत गर्दी केली होती, तर पोलिस ठाण्यासमोर माने समर्थक जमा झाले होते. त्यामुळे परिसरात तणाव होता. याबाबत दोघांकडूनही पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.

महापालिकेने चैत्रबन ते आरवाडे पार्क हा नाला बंदिस्त करण्यासाठी दहा कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. माने यांच्याशी संबंधित एकाने निविदा भरली होती. या निविदेवरून सूर्यवंशी व माने यांच्यात वाद सुरू होता. शुक्रवारी स्थायी समितीची सभा होती. यावेळी माने महापालिकेच्या आवारात आले होते. सभेचे कामकाज संपल्यानंतर सूर्यवंशी व माने यांच्यात महापालिकेच्या आवारातील पार्किंगच्या जागेत वाद होऊन मारामारी सुरू झाली. काही नगरसेवकांसह उपस्थित कर्मचारी, नागरिकांनी दोघांतील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. गर्दी पाहून शहर पोलिस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आवारात धाव घेतली. पोलिसांनी माने यांना ठाण्यात आणले.

या मारामारीचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी महापालिका मुख्यालयासमोर गर्दी केली होती, तर समोरच शहर पोलिस ठाण्याच्या आवारात माने समर्थक जमा झाले होते. दोघांनी बाजूंनी समर्थकांची गर्दी झाल्याने काहीकाळ तणावाची स्थिती होती. पोलिसांनी तणाव निवळेपर्यंत माने यांना पोलिस ठाण्यातच बसून ठेवले होते. सुमारे तासभराच्या गोंधळानंतर तणाव निवळला.भाजप नेत्यांची फोनाफोनीभाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत मारामारी झाल्याचे वृत्त पसरताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने दखल घेत सावरासावर सुरू केली. दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी फोनाफोनी करण्यात आली. भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यानेही दोघांशी संपर्क साधला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या मारामारीची पोलिसांत नोंद झाली नव्हती.महापालिकेच्या आवारात धीरज सूर्यवंशी व अतुल माने यांच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाली. दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. - अभिजित देशमुख, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली