शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कारातून निषेध, अधिकाऱ्यांनी विधानावरुन घेतला यु टर्न

By शीतल पाटील | Updated: January 17, 2023 21:27 IST

थंडीमुळे नदीतील मासे मेले, हे बोललोच नाही!

शीतल पाटील 

सांगली : बहे-बोरगाव येथे मृत माशांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने थंडीचे कारण दिले होते. त्याचा निषेध करण्यासाठी कृष्णा महापूर समिती व आंदोलन अंकुशचे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांचा सत्कार करण्याचा निर्धार करीत कार्यालय गाठले. पण त्यांनी मी असे बोललोच नाही. केवळ शक्यता व्यक्त केली होती. माझ्या विधानाचा विपर्यास्त करण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेली.

काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीतील मासे मृत झाले होते. कडाक्याच्या थंडीमुळे मासे मृत झाल्याचे वक्तव्य प्रदूषण मंडळाकडून करण्यात आले. यावर कृष्णा महापूर समिती व शिरोळच्या आंदोलन अंकुशचे पदाधिकारी आक्रमक झाले. मंगळवारी त्यांनी सांगलीतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठले. मासे कशामुळे मृत झाले? त्यांचे प्रयोगशाळेत चाचणी केली आहे का, अशी विचारणा केली.त्यावर अवताडे यांनी हवामानातील बदल, रासायनिक दूषित पाणी, ऑक्सिजनचे कमी प्रमाण अशा कारणामुळे मासे मृत होऊ शकतात. काहींनी माझ्या शब्दाचा विपर्यास केला आणि थंडीने मासे मृत्यू झाले असे वृत्त पसरविले, असे स्पष्टीकरण दिले. यावर कार्यकर्त्यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल केला.

पाण्याचे नमुने आणि माशांचे अवयव घेतलेले आहेत. तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी, कारखान्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही अवताडे यांनी दिले. संबंधित कारखान्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चिडमुंगे यांनी दिला. यावेळी सर्जेराव पाटील, दीपक पाटील, संजय कोरे, संभाजी शिंदे, भूषण गंगावणे, आनंद भातमारे, सचिन सगरे, अमर माने, रियाज मुल्ला उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलनfishermanमच्छीमार